अमित-प्रतीक्षा हत्याकांडात मुख्य साक्षीदाराची नोंदविली साक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 15:20 IST2019-03-06T15:20:09+5:302019-03-06T15:20:14+5:30

राज्यभर गाजलेल्या या बहुचर्चीत हत्याकांड प्रकरणाची सुनावणी तब्ब्ल ११ वर्षांनंतर प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनिका आरलँड यांच्या न्यायालयात सुरू झाली असून, मंगळवारी या हत्याकांडातील मुख्य साक्षीदाराची साक्ष नोंदविण्यात आली.

Witness recorded in the Amit-Pratiksha murder case | अमित-प्रतीक्षा हत्याकांडात मुख्य साक्षीदाराची नोंदविली साक्ष

अमित-प्रतीक्षा हत्याकांडात मुख्य साक्षीदाराची नोंदविली साक्ष

अकोला - गायगाव रोडवरील बाराखोली परिसरात अमित-प्रतीक्षा यांना बांधून ठेवून प्रतीक्षा नामक मुलीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर हत्याकांड करण्यात आले होते. राज्यभर गाजलेल्या या बहुचर्चीत हत्याकांड प्रकरणाची सुनावणी तब्ब्ल ११ वर्षांनंतर प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनिका आरलँड यांच्या न्यायालयात सुरू झाली असून, मंगळवारी या हत्याकांडातील मुख्य साक्षीदाराची साक्ष नोंदविण्यात आली.
जुने शहरातील रहिवासी अमित आणि त्याची मैत्रीण प्रतीक्षा (१६) हे दोघे जण शिकवणी वर्ग आटोपल्यानंतर गायगाव रोडवरील बाराखोली परिसरात १४ जून २००८ रोजी दुचाकीने जात होते. अमित-प्रतीक्षा दोघेही बसलेले असताना मनीष श्रीकृष्ण खंडारे रा. डाबकी रोड, हुसेन खा सुजात खा रा. गायगाव, नितीन देवराव मोरे रा. डाबकी रोड, इमाम खा सुजात खा रा. गायगाव, गुलाम आबीद गुलाम मुस्तफा रा. गायगाव, अब्दुल आरीफ अब्दुल वहाब, मंगेश भगेवार, मोहसीन खा ऊर्फ मीठ्ठू, आसीफ खा शेख अहमद ऊर्फ फकीरा शेख महेमुद, हरिदास बिल्लेवार, शेख हबीब ऊर्फ कल्या शेख मजीद, चंदन वाकोडे व शेख जहीर शेख अमीर या १३ नराधमांनी अमितला दोराने बांधून ठेवत प्रतीक्षावर सामूहिक बलात्कार करून दोघांचीही हत्या केली. त्यानंतर दोघांचेही मृतदेह रेल्वे रुळावर ठेवून ते आत्महत्या करीत असल्याचा बनाव केला होता. यामधील हुसेन खा सुजात खाने आत्महत्या करीत असल्याची खोटी सुसाईड नोटही तयार केली होती. याप्रकरणी उरळ पोलिसांनी १३ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास केल्यानंतर दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनिका आरलँड यांच्या न्यायालयात सुरू झाली असून, मंगळवारी मुख्य साक्षीदाराची साक्ष तपासण्यात आली. त्यानंतर आरोपींच्या ५ ते ६ वकिलांनी मुख्य साक्षीदाराची उलट तपासणी केली. या प्रकरणात आणखी एका साक्षीदाराची १८ मार्च रोजी साक्ष होणार आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते, तर हत्येसाठी वापरलेले शस्त्रही यावेळी दाखविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळावरून चाकू, लोखंडी रॉड, धारदार शस्त्र, दोन दुचाकी व दोघांच्याही मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दिलेली १५ हजार रुपयांची रोकड जप्त केली होती.

 

Web Title: Witness recorded in the Amit-Pratiksha murder case