शहरं
Join us  
Trending Stories
1
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
2
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
3
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
4
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
5
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
6
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
7
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
8
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
9
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
10
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
11
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
12
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
13
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
14
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
15
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
16
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
18
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
19
इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या, पण 'या' ५ बाईक महागाईच्या काळातही ठरतील संकटमोचक!
20
इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा

By admin | Updated: May 9, 2014 00:55 IST

जिल्हय़ातील मानोरा तालुका वगळता सर्वच तालुक्यांना वादळी पावसाने बुधवारी रात्री व आज (दि.८) रोजी सकाळी तडाखा दिला.

 वाशिम : जिल्हय़ातील मानोरा तालुका वगळता सर्वच तालुक्यांना वादळी पावसाने बुधवारी रात्री व आज (दि.८)  रोजी सकाळी तडाखा दिला. मंगरुळपीर तालुक्यात जिल्हय़ात सर्वाधिक पाऊस पडला. या वादळी पावसामुळे आंबा, भाजीपालावर्गीय पिके व उन्हाळी मूग, भुईमूग पिकांचे नुकसान झाले.
गत फेब्रुवारी-मार्चमध्ये वादळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्हय़ात शेतकर्‍यांची रब्बी पिके भाजीपाला व फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. या संकटातून सावरत अनेक शेतकर्‍यांनी त्यांच्या ओलिताच्या शेतात उन्हाळी मूग व भुईमूग पिकांची लागवड केली; परंतु बुधवारी रात्री व आज  जिल्हय़ात मंगरुळपीर, कारंजा, वाशिम, मालेगाव व रिसोड तालुक्यात वादळी  पावसाने हजेरी लावली.
कारंजा तालुक्यात बुधवारी रात्री ७ ते ९ वाजताच्या दरम्यान व आज सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत पाऊस पडला. मंगरुळपीर तालुक्यात बुधवारी उत्तररात्री २.३0 वाजतापासून आज सकाळी ८.३0 वाजेपर्यंत पाऊस  सुरू होता. वाशिम व मालेगाव तालुक्यात आज सकाळी ६ ते ८.३0 वाजताच्या दरम्यान जोरदार पाऊस पडला. रिसोड तालुक्यात तुरळक स्वरूपाचा रिमझिम -रिमझिम असा पाऊस सकाळी ७.१५ ते ९.३0 वाजताच्या दरम्यान पडला.