शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

‘ग्रीन झोन’साठी हवा अकोलेकरांचा पुढाकार!

By admin | Updated: June 17, 2017 01:07 IST

तीन वर्षांची देखभाल दुरुस्ती; लाखो रुपयांची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शहराच्या तापमानात दिवसेंदिवस होणारी वाढ लक्षात घेता आणि चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अकोलेकरांनी शहरात वृक्षारोपणासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. महापालिकेच्या ‘ग्रीन झोन’च्या संकल्पनेला पूर्णत्वास नेण्यासाठी नागरिकांनी समोर येण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. महापालिका क्षेत्रात टोलेजंग इमारती, लक्झरीयस सदनिका उभारण्याच्या नादात वृक्षांची खुलेआम कत्तल करण्यात आली. गल्ली-बोळांसह सर्व्हिस लाइनमध्येदेखील सिमेंट काँक्रिटीकरणाला प्राधान्य देण्यात आल्याचा परिणाम शहराच्या वातावरणावर झाला. सिमेंट काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्यांमुळे उन्हाळ््यातील उकाडा असह्य होत चालला आहे. यावर कायम स्वरूपी उपाय म्हणून शहरात ठिकठिकाणी वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करण्याची गरज निर्माण झाली आहे. शासनाने ‘अमृत’योजनेंतर्गत ‘ग्रीन झोन’निर्माण करण्यासाठी मनपाकरिता ४ कोटींच्या निधीची तरतूद केली. ‘ग्रीन झोन’चा उद्देश सफल होण्यासाठी मनपाला किमान ५० हजार चौरस फूट पेक्षा अधिक जागेची आवश्यकता आहे. अशा जागांचा मनपाकडून शोध घेतला जात असून, जागेसाठी अकोलेकरांना आवाहन करण्यात आले आहे. ज्या जागा निश्चित झाल्या, त्यांचा प्रकल्प अहवाल (डीपीआर)तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तीन वर्षांची देखभाल दुरुस्ती५० हजार चौरस फूट किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळ असणाऱ्या जागेवर ‘ग्रीन झोन’उभारण्याची संकल्पना आहे. त्यामध्ये जागेला तारेचे कुंपण उभारणे, सावली देणाऱ्या मोठ्या वृक्षांचे रोपण करणे, हिरवळ निर्माण करणे, शोभीवंत झाडे लावणे, वयोवृद्धांसाठी बसण्यास बेंच, पाण्याची सुविधा, चौकीदाराची खोली, पथदिव्यांची सुविधा निर्माण करण्याचा समावेश आहे. तीन वर्षांपर्यंत देखभाल दुरुस्ती करण्याच्या बदल्यात मनपाने संबंधित ‘ग्रीन झोन’वर लाखो रुपयांची तरतूद केली आहे. वातावरणावर होईल परिणाम‘अमृत’योजनेंतर्गत शासनाने ‘ग्रीन झोन’साठी केलेली आर्थिक तरतूद पाहता केवळ वृक्ष लागवड करणे हा उद्देश नसून, त्याचे संगोपन करण्याचे निकष ठरवून देण्यात आले आहेत. ही संकल्पना शहरात पहिल्यांदाच राबवल्या जात असल्याने अकोलेकरांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. शहराच्या विविध भागात निर्माण केल्या जाणाऱ्या ‘ग्रीन झोन’मुळे पर्यावरणासह शहराच्या वातावरणात निश्चितच सकारात्मक परिणाम पहावयास मिळतील,असा जाणकारांना आशावाद आहे. शहराला हिरवेगार करून आपल्या पुढच्या पिढीचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी अकोलेकरांनी समोर येण्याची गरज आहे. ‘ग्रीन झोन’निर्माण करण्यासोबतच आपल्याला शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करायचे आहे. याकरिता स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, शाळा, महाविद्यालये, शासकीय-निमशासकीय कार्यालयांसह वृक्षप्रेमींनी पुढाकार घ्यावा, ही अपेक्षा.- अजय लहाने, आयुक्त मनपा.