वंचित बहुजन आघाडीचा टक्का वाढणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 21:21 IST2019-04-06T21:19:32+5:302019-04-06T21:21:27+5:30
बहुजन वंचित आघाडी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात महत्त्वाची आहे.

वंचित बहुजन आघाडीचा टक्का वाढणार?
- राजरत्न सिरसाट,
अकोला: राज्यात तिसरा पर्याय निर्माण करणारे भारिप बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड़ प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात ४८ जागी उमेदवार उभे करू न महाआघाडी, महायुतीसमोर आव्हान उभे केले. प्रथमच नवीन प्रयोग करीत त्यांनी बलुतेदार, अलुतेदार, वंचितांना प्रतिनिधित्व दिले. हा प्रयोग यशस्वी किती होतो, हे निवडणुकांचा निकाल लागल्याावरच समोर येईल; पण आता तरी राज्यात त्यांनी चुरस निर्माण केली. त्यांच्या सभांना स्वयंस्फूर्तीने मिळणारा प्रतिसाद दखलपात्र नव्हे, तर विचार करायला लावणारा आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत त्यांचा मतदानाचा टक्का वाढणारच असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.त्यामुळे निवडणुकीत वचिंत बहुजन आघाडीच्या कामगीरीकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.
१९८४ मध्ये अकोल्यात पाऊल ठेवल्यानंतर आंबेडकरांनी मागे वळून बघितले नाही. भारतीय रिपब्लिकन पक्षाची चळवळ त्यांनी सुरू केली. बहुजन समाजाला एकत्र करण्यासाठी त्यांनी त्यानंतर भारतीय रिपब्लिकन पक्ष-बहुजन महासंघ (भारिप-बमसं) नामकरण केले. याच काळात अकोला पॅटर्न उदयास आला. अकोला जिल्हा परिषद, पंचायत समित्या तसेच ग्रामपंचायत काबीज करीत त्यांनी विधानसभेत पाच आमदार निवडून आणले. बाळासाहेब आंबेडकरही अकोल्यातून दोनदा लोकसभेवर निवडून गेले. अकोल्यात त्यांनी केलेले ‘सोशल इंजिनिअरिंग’ पश्चिम विदर्भात रुजू लागले. हा प्रयोग चळवळीला राज्यात व्यापक स्वरू प प्राप्त करू न देण्यासाठी आंबेडकरांना ३५ वर्षे खर्ची घालावी लागली. मागील वर्षी त्यांनी बहुजन वंचित आघाडी निर्माण करू न चळवळीला नवीन धार निर्माण केली. पंढरपूरला धनगर समाजाच्या मेळाव्यात निर्धार क रीत राज्यातील वंचितांना सोबत घेऊन त्यांनी वादळ निर्माण केले. त्यांच्या सभांना होणारी गर्दी, मुंबईतील शिवाजी पार्कची सभा ही लक्षवेधी ठरली. वंचितांचा वाढता सहभाग बघता, त्यांनाही प्रतिनिधित्व मिळावे म्हणून त्यांनी कोणत्याही पक्षासोबत युती न करता ४८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आणि त्या समाजामध्ये चैतन्य निर्माण के ले. त्यांच्या या भूमिकेवर मात्र टीका करणाºयांची यादी वाढत गेली; पण आंबेडकर त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. वंचितांना त्यांच्या अधिकाराची जाणीव व्हावी, असा त्यांचा उद्देश आहे.
राज्यातील ४८ मतदारसंघांतील उमेदवार व उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांच्यासोबत स्वयंस्फूर्तीने जाणाºया कार्यकर्त्यांची गर्दी बघितल्यास यावेळी बहुजन वंचित आघाडीचा मतदानाचा टक्का वाढेल, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुका आहेत. विधानसभा निवडणूक खºया अर्थाने त्यांचे लक्ष्य आहे. त्यानुषंगाने त्यांचे नियोजन असल्यास वंचित बहुजन आघाडीतील वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेतून हे लक्षात येते. विधानसभा निवडणुकीची ही त्यांची लिटमस टेस्ट असल्याचे वरिष्ठ कार्यकर्ते बोलतात. त्याच अनुषंगाने ही बांधणी आहे. राज्यात बॅ. असुदुद्दीन ओवैसी यांच्या एक-दोन सभा वगळता अॅड़ बाळासाहेब आंबेडकरांकडेच प्रचाराची धुरा आहे. ओवैसींच्या ‘एमआयएम’सोबतची युती ही मुस्लीम मतांची मोट बांधण्याचा हा त्यांचा प्रयोग आहे. हाच प्रयोग विधानसभेतही राहणार असल्याने विधानसभेत तर नक्कीच वेगळे करू न दाखवू, असे वंचित बहुजन आघाडीला वाटते.