शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
7
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
8
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
9
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
10
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
11
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
12
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
13
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
14
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
15
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
16
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
18
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
19
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
20
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी

अंधांना दिशा देईल आता डिजिटल पांढरी काठी - मुनशेट्टीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 1:18 AM

अकोला : मार्गक्रमण करताना  खाचखडग्याचा अचूक शोध घेण्यासाठी आता  डिजिटल पांढरी काठी अंधांना दिशा देणार आहे. अद्ययावत असलेल्या या डिजिटल काठीचा आणि आधुनिक सहा थेंबाच्या ब्रेल लिपिचा वापर  करून, अंध महिला आणि युवतींनी समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन नॅब युनिट  महाराष्ट्रचे मुक्तेश्‍वर मुनशेट्टीवार यांनी केले.

ठळक मुद्देशंभर अंध महिला व युवतींनी घेतले ब्रेल लिपीचे प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मार्गक्रमण करताना  खाचखडग्याचा अचूक शोध घेण्यासाठी आता  डिजिटल पांढरी काठी अंधांना दिशा देणार आहे. अद्ययावत असलेल्या या डिजिटल काठीचा आणि आधुनिक सहा थेंबाच्या ब्रेल लिपिचा वापर  करून, अंध महिला आणि युवतींनी समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन नॅब युनिट  महाराष्ट्रचे मुक्तेश्‍वर मुनशेट्टीवार यांनी केले. अकोल्यातील शिवाजी महाविद्यालयात झालेल्या प्रशिक्षण शिबिरात ते बोलत  होते. कोइंबतूर येथील यूडीआयएस फोरम, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड युनिट महाराष्ट्र, अकोला जिल्हा शाखा, अनहद अपंग कल्याण संस्था आणि शिवाजी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने २४ ते २८ डिसेंबरदरम्यान अकोल्यात अंध महिला व युवतींना मोबीलिटी आणि ब्रेल लिपीचे प्रशिक्षण देण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार प्रकाश पोहरे, उद्घाटक म्हणून सूर्यभान साळुंके, नॅब युनिट महाराष्ट्रचे मुक्तेश्‍वर मुनशेट्टीवार, डॉ. अविनाश पाटील, राम  शेगोकार, प्रा. श्रीनिवासन, प्रा. विशाल कोरडे, प्रा. गजानन मानकर, प्रा. अरविंद देव, प्रा. चेतन टेटू, प्रा. उमा राठी यांनी मोबीलिटी आणि ब्रेल लिपी संदर्भात मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला महाराष्ट्रभरातून शंभर अंध युवती आणि महिलांनी हजेरी लावली. कार्यक्रमाला प्रा. हर्षवर्धन मानकर, अंजली मेतकर, काजल रेलू सिंधानी, सुमन कोल्हे, संजय देशमुख, नयना शेंगोकार यांनी आणि  राखी जीवतानी, गौतमी  चव्हाण, पूर्वा घुमाळे, पूनम वाशीमकर, लक्ष्मी वाघ, लीना बोंळे, प्राज्वाला नागले, माधुरी देठे, सत्यशीला कांबळे, या शिबिरार्थींनी मनोगत व्यक्त  केले. कार्यक्रमाचा समारोप सांस्कृतिक कार्यक्रमाने झाला. येथे नितीन खंडारे, तुलसीदास  तिवारी, प्रसन्ना टापी, युक्ता  साठे, मोनाली  देव, वैभवी गवई, लक्ष्मी वाघ, ज्योत्स्ना पवार यांनी कला सादर केली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. विशाल कोरडे, भूषण मोडक, विशाल भोजने यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अकोला नॅब शाखेचे विजय सारभूकन, डॉ. नितीन उपाध्ये, वैशाली ओंनकर, महादेव मेंहगे, प्रा. विनोद देशमुख, प्रा. विनोद शेगोकार, अतुल थोरात, विनोद जाधव, अखिलेश यादव, स्वप्निल गायकवाड, रागिणी खोडवे, विजय कोरडे, गौरी शेगोकार यांनी परिश्रम घेतलेत.

टॅग्स :Akola cityअकोला शहर