किरकोळ वादातून पतीने केली पत्नीची हत्या, पती मानसिक रुग्ण असल्याची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 11:37 IST2017-11-24T11:37:01+5:302017-11-24T11:37:14+5:30

मानसिक रुग्ण असलेल्या पतीने किरकोळ वादातून पत्नीच्या डोक्यात घरातील दगडी पाटा घालून तिची निर्घृण हत्या केली. अकोल्यातील हा धक्कादायक प्रकार आहे. ही घटना शुक्रवारी (24 नोव्हेंबर) पहाटे 5.30 वाजताच्या सुमारास कृषि नगर भागात घडली आहे.

wife Murdered by mentally ill Husband | किरकोळ वादातून पतीने केली पत्नीची हत्या, पती मानसिक रुग्ण असल्याची माहिती

किरकोळ वादातून पतीने केली पत्नीची हत्या, पती मानसिक रुग्ण असल्याची माहिती

अकोला - मानसिक रुग्ण असलेल्या पतीने किरकोळ वादातून पत्नीच्या डोक्यात घरातील दगडी पाटा घालून तिची निर्घृण हत्या केली. ही घटना शुक्रवारी (24 नोव्हेंबर) पहाटे 5.30 वाजताच्या सुमारास कृषि नगर भागात घडली आहे. या प्रकरणात सिव्हिल लाईन पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे. कृषिनगर परिसरात रमेश तायडे व त्याची पत्नी कविता दोन मुली व एका मुलासहीत राहात होते. रमेश तायडे याचा काही वर्षांपूर्वी अपघात झाला होता. यात त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती. रूग्णालयात उपचार घेत असतात तो कोमामध्येही गेला होता. नंतर काही महिन्यांनी तो कोमातून बाहेर आला.

तेव्हापासून तो विचित्र वागत असल्याची माहिती समोर आली आहे. पत्नी कवितासोबत नेहमीच किरकोळ वाद होत असायचे. गुरूवारी (23 नोव्हेंबर) रात्री रमेश तायडे याने पत्नी कवितासोबत वाद घातला. तिला मारहाणही केली. शुक्रवारी पहाटे कविता मुलीला पिण्यास पाणी देण्यासाठी उठली होती. तिने मुलीला पाणी दिले. मुलगी झोपायला गेली. दरम्यान यावेळी पती रमेश तायडे हा कविताच्या मागे व त्याने घरातील दगडी पाटा तिच्या डोक्यात घातला. पतीनं केलेल्या हल्ल्यात कविताचा जागीच मृत्यू झाला. रमेश तायडे हा गवंडीकाम करायचा. सिव्हिल लाईन पोलिसांनी कविताच्या मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सवोपचार रूग्णालयात पाठविला आहे. पुढील तपास ठाणेदार अन्वर शेख करत आहेत.

Web Title: wife Murdered by mentally ill Husband

टॅग्स :Murderखून