‘व्हाइट कोल’मधील चारा वापरावर येणार बंदी!
By Admin | Updated: January 19, 2015 02:39 IST2015-01-19T02:39:37+5:302015-01-19T02:39:37+5:30
अहवाल सादर करण्याचे अकोला जिल्हाधिका-यांचे निर्देश.

‘व्हाइट कोल’मधील चारा वापरावर येणार बंदी!
संतोष येलकर / अकोला: चाराटंचाईच्या परिस्थितीत ह्यव्हाइट कोलह्णमधील चार्याच्या वापरावर बंदी घालण्यात येणार आहे. व्हाइट कोल (गट्ट) तयार करणार्या कारखान्यांची पाहणी करून, अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांनी जिल्हा पशुसंवर्धन विभागाला दिले आहेत. यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, खरीप हंगामातील पिके शेतकर्यांच्या हातून गेली. नापिकीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यात चाराटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. पिकांचे उत्पादन बुडाल्याने, जिल्हय़ातील चारा उत्पादनातही प्रचंड घट झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पशुधनासाठी लागणार्या चार्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. उन्हाळ्यात चाराटंचाईचा प्रश्न आणखी गंभीर होणार असून, जनावरांना जगविण्यासाठी चारा कोठून आणावा, असा प्रश्न जिल्ह्यातील पशुपालक शेतकर्यांसमोर निर्माण झाला आहे. दरम्यान, जनावरांच्या चार्यासाठी वापरात येणार्या सोयाबीन, तूर, गहू, हरभरा, भुईमूग कुटारासह शेतीतील पालाचोळ्याचा वापर व्हाइट कोलमध्ये (गट्ट) मोठय़ा प्रमाणात केला जातो. त्यासाठी व्हाइट कोल कारखान्यांकडून विविध कुटार आणि शेतीतील पालापाचोळ्याची मोठय़ा प्रमाणात खरेदी केली जाते. जनावरांच्या चार्यासाठी उपयोगात येणार्या कुटारांचा व्हाइट कोलमध्ये होणारा वापर चाराटंचाईत आणखीच भर टाकणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील चाराटंचाईच्या परिस्थितीत व्हाइट कोलमधील चार्याच्या वापरावर बंदी घालण्यात येणार आहे. त्यासाठी व्हाइट कोल तयार करणार्या अकोल्यातील औद्योगिक क्षेत्र आणि विकास केंद्रातील कारखान्यांची पाहणी करून, कारखान्यांमध्ये व्हाइट कोल तयार करण्यासाठी सोयाबीन, तूर, गहू व इतर कुटरांचा वापर केला जातो काय, यासंदर्भात तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या अधिकार्यांना शुक्रवारी दिले. पशुधन विकास अधिकारी डॉ.रंजित गोळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जिल्हाधिकार्यांच्या निर्देशानुसार व्हाइट कोल तयार करणार्या सहा कारखान्यांची पाहणी केली जाणार असल्याचे स्पष्ट करून या पाहणीमध्ये व्हाईट कोल तयार करण्याकरिता चार्याचा वापर केला जातो काय, यासंदर्भात तपासणी करून अहवाल जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्यात येणार असल्याचे सांगीतले.