शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

तहान लागल्यावर धावपळ केव्हा थांबणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:47 IST

जिल्हय़ातील खारपाणपट्टय़ातल्या खांबोरा  प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ६१  गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा रविवारपासून सुरू करण्यात  आला;  मात्र या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी महान पासून खांबोरापर्यंत जलवाहिनी टाकण्याच्या योजनेचे काम  पूर्ण झाले असते तर, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ  आली नसती. त्यानुषंगाने तहान लागल्यावर पाणीपुरवठा  करण्याची प्रशासनाकडून होणारी धावपळ केव्हा थांबणार,  याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण निर्माण होत आहे.

ठळक मुद्दे६१ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा महान ते खांबोरा जलवाहिनीची योजना केव्हा मार्गी लागणार?

संतोष येलकर। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्हय़ातील खारपाणपट्टय़ातल्या खांबोरा  प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ६१  गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा रविवारपासून सुरू करण्यात  आला;  मात्र या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी महान पासून खांबोरापर्यंत जलवाहिनी टाकण्याच्या योजनेचे काम  पूर्ण झाले असते तर, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ  आली नसती. त्यानुषंगाने तहान लागल्यावर पाणीपुरवठा  करण्याची प्रशासनाकडून होणारी धावपळ केव्हा थांबणार,  याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण निर्माण होत आहे.यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन तीन  महिन्यांचा कालावधी  उलटून गेला; मात्र दमदार पाऊस झाला नसल्याने, अकोला  शहरासह खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४  गावांना पाणीपुरवठा करणार्‍या महान येथील काटेपूर्णा  धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे खांबोरा  प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी धरणातून पाणीपुरवठा बंद  करण्यात आला आहे. खांबोराजवळील उन्नई बंधार्‍यातून  खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना आठ  दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता; परंतु उन्नई  बंधार्‍यातील पाणी संपल्याने योजनेंतर्गत गावांचा पाणीपुरवठा  गत ७ ऑगस्टपासून बंद करण्यात आला. त्यामुळे योजनेंतर्ग त ६४ गावांमध्ये पावसाळ्याच्या दिवसांत जलसंकटाची  परिस्थिती निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस् थांना पायपीट करावी लागत आहे. त्यानुषंगाने,  पाणीटंचाईग्रस्त ६१ गावांना ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू  करण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी ७ सप्टेंबर रोजी दिला. त्यानुसार १0 सप्टेंबरपासून, टप्प्याटप्प्याने गावांना टँकरद्वारे  पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. वर्षभरापूर्वीदेखील  खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त  गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. या  पृष्ठभूमीवर या गावांना महान येथील काटेपूर्णा धरणातून  पाणीपुरवठा करण्याकरिता काटेपूर्णा नदीपात्रात पाणी  सोडल्याने होणारा पाण्याचा अपव्यय थांबवून महानपासून  खांबोराजवळील उन्नई बंधार्‍यापर्यंत जलवाहिनी टाकणे  आणि त्याद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी २२ कोटी रुपयांच्या  योजनेला शासनामार्फत मंजुरी देण्यात आली आहे; परंतु,  जलवाहिनी टाकण्याच्या योजनेचे काम अद्याप पूर्ण झाले  नसल्याने, ६0 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ  आली आहे. त्यामुळे पाणीटंचाईग्रस्त ६४ गावांना  कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी महानपासून  खांबोरापर्यंत जलवाहिनी टाकण्याची योजना केव्हा मार्गी  लागणार आणि या गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण  झाल्यानंतर ग्रामस्थांची तहान भागविण्याकरिता टँकरद्वारे  पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून होणारी नेहमीची  धावपळ केव्हा थांबणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.

टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केलेली अशी आहेत गावे!आपातापा, खोबरखेड, जलालाबाद, मजलापूर, आख तवाडा, गोणापूर, शामाबाद, सुलतान अजमपूर, आपोती  खुर्द, आपोती बु., कौलखेड गोमासे, मारोडी, दापुरा,  अंबिकापूर, अनकवाडी, घुसर, घुसरवाडी, कासली बु.,  कासली खुर्द, लाखोंडा बु., लाखोंडा खुर्द, म्हातोडी, नव थळ, खेकडी, परितवाडा, आगर, वल्लभनगर, हिंगणा  तामसवाडी, वैराट, गांधीग्राम, निराट, गोपालखेड, राजापूर,  धामणा, गोत्रा, पाळोदी, सांगवी खुर्द, सांगवी बु.,  फरमादाबाद, निंभोरा, कंचनपूर, अलियाबाद, बादलापूर,  सांगळूद बु., सांगळूद खुर्द, वरोडी, वाकी, नावखेड, धोतर्डी,  दहीगाव, बहिरखेड, रामगाव, गोंदापूर, पळसो बु., बहादर पूर, कौलखेड जहागीर, बोरगाव मंजू, निपाणा, सुकळी व  कानशिवणी.

महान-खांबोरा जलवाहिनीची योजना निविदा प्रक्रियेत!खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला महान येथील काटे पूर्णा धरणातून काटेपूर्णा नदीपात्राऐवजी जलवाहिनीद्वारे पाणी  सोडण्यासाठी महान ते खांबोराजवळील उन्नई बंधार्‍यापर्यंत  जलवाहिनी टाकण्यासाठी २२ कोटींच्या योजनेला  शासनामार्फत मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुषंगाने या  योजनेच्या कामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत  निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण  होणे अद्याप बाकी आहे.

देवरी फाटा, अकोटमधून ६१ गावांना टँकरद्वारे पाणी!पाणीटंचाईग्रस्त ६१ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा  करण्यासाठी ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेच्या अकोट येथील  जमिनीखालील टाकीतून (सम्प) आणि देवरी फाटा येथील  जमिनीखालील टाकीतून (सम्प) पाणी टँकरद्वारे आणण्यात  येत आहे. ४५ पैकी १२ टँकरद्वारे सोमवारपर्यंत गावांना पाणी पुरवठा करण्यात आला असून, टप्प्याटप्प्याने टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात येत आहे.