महावितरण, सर्वोपचारमधील निवासस्थानांचा पाणीपुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 14:45 IST2019-02-08T14:45:35+5:302019-02-08T14:45:39+5:30
अकोला: एक-दोन हजार रुपये नव्हे तर तब्बल १० लक्ष ५४ हजार रुपये एवढ्या मोठ्या रकमेची पाणीपट्टी जमा करण्यास चालढकल करणाऱ्या महावितरण, महापारेषणसह सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाला गुरुवारी महापालिका प्रशासनाने जोरदार झटका दिला.

महावितरण, सर्वोपचारमधील निवासस्थानांचा पाणीपुरवठा बंद
अकोला: एक-दोन हजार रुपये नव्हे तर तब्बल १० लक्ष ५४ हजार रुपये एवढ्या मोठ्या रकमेची पाणीपट्टी जमा करण्यास चालढकल करणाऱ्या महावितरण, महापारेषणसह सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाला गुरुवारी महापालिका प्रशासनाने जोरदार झटका दिला. संबंधित अधिकारी, कर्मचाºयांच्या शासकीय निवासस्थानांची नळ जोडणी खंडित करून पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई प्रशासनाने केली.
शहरात महावितरण कंपनीसह महापारेषण व सर्वोपचार रुग्णालयातील शासकीय अधिकारी-कर्मचाºयांच्या निवासस्थानांना महापालिकेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. प्रशासकीय यंत्रणा असतानासुद्धा संबंधितांकडून मनपाच्या पाणीपट्टीचा भरणा केला जात नसल्याचे केविलवाणे चित्र आहे. संबंधित यंत्रणांकडे तब्बल १० लक्ष ५४ हजार रुपये पाणीपट्टी थकीत असून, अद्यापपर्यंत पाणीपट्टीचा भरणा करण्यात आला नाही. यासोबतच नळ जोडणीला मीटर बसविण्याबाबत संबंधितांकडून कार्यवाही केली जात नसल्याचे मनपा जलप्रदाय विभागाच्या वारंवार निदर्शनास आले आहे. यासंदर्भात संबंधित तीनही यंत्रणांना सातत्याने सूचना दिल्यानंतरही उपाययोजना होत नसल्याचे पाहून अखेर गुरुवारी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी नळ जोडणी खंडित करून पाणीपुरवठा बंद करण्याचा आदेश जलप्रदाय विभागाला दिला. त्यानुसार महावितरण, महापारेषण तसेच सर्वोपचार रुग्णालयातील अधिकारी-कर्मचाºयांच्या शासकीय निवासस्थानांचा पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई करण्यात आली.
१२४ निवासस्थानांचा पाणीपुरवठा बंद
जलप्रदाय विभागाच्या धडक कारवाईमुळे महावितरण, महापारेषण तसेच सर्वोपचार रुग्णालयातील अधिकारी-कर्मचाºयांच्या एकूण १२४ निवासस्थानांचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. अवघ्या पाच ते दहा हजार रुपये थकीत मालमत्ता करापोटी मनपाकडून सर्वसामान्यांच्या घरांना सील लावल्या जाते. अशा स्थितीत लाखो रुपये पाणीपट्टी थकविणाºया यंत्रणांवर मनपाने केलेल्या कारवाईचे अकोलेकरांनी स्वागत केले आहे.