शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

धरणातील जलसाठा संपण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 3:20 PM

अकोला: अर्धा पावसाळा संपला; पण दमदार पाऊस पडला नसल्याने जिल्ह्यातील धरणातील जलसाठा संपण्याच्या मार्गावर आहे.

अकोला: अर्धा पावसाळा संपला; पण दमदार पाऊस पडला नसल्याने जिल्ह्यातील धरणातील जलसाठा संपण्याच्या मार्गावर आहे. उमा व निर्गुणा या दोन धरणात शून्य टक्के जलसाठा आहे. अकोल्याची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात ३.५ टक्के साठा शिल्लक आहे. मागील आठ दिवसांपासून हा साठा स्थिर असला तरी ३५ ते ४० दिवस पुरेल एवढाच आहे. त्यामुळे सर्वांनाच दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.जिल्ह्यात बार्शीटाळी तालुक्यातील महानचे काटेपूर्णा व तेल्हारा तालुक्यातील वान ही दोन मोठी धरणे आहेत. तर तीन मध्यम स्वरू पाची धरणे आहेत. यात मूर्तिजापूर तालुक्यातील उमा तसेच घुंगशी बॅरेज, पातूर तालुक्यातील मोर्णा व निर्गुणा धरण आहे. बार्शीटाकळी तालुक्यात दगडपारवा प्रकल्प आहे. तथापि, यातील निर्गुणा व उमा धरण शून्य टक्के असून, घुंगशी बॅरेजमध्ये २.७८ टक्के साठा आहे. मोर्णा धरणात १०.४४ टक्के जलसाठा आहे. वान धरणात २६.९९ टक्केच जलसाठा आहे. गतवर्षी या धरणातून यावेळी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. दरम्यान, काटेपूर्णा धरणात जलपातळी मागील आठ दिवसांपासून स्थिर आहे. २५ ते २६ जुलैपासून पाऊस सुरू झाल्यानंतर पातळीत ०.१ दोन टक्क्यांचा फरक पडला. मागील आठ ते दहा दिवसाची टक्केवारी बघितल्या २० जुलै रोजी काटेपूर्णा धरणात ३.४७ टक्के जलसाठा होता. २६ जुलै ते २८ जुलैपर्यंत हा साठा ३.९ टक्के स्थिर होता. २९ जुलै रोजी मात्र यात ०.४ टक्के घट झाली. येत्या ३० व ३१ रोजी विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे; परंतु हा इशारा केवळ किरकोळ ठिकाणी असल्याने अकोलेकरांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाचे चित्र बघता महापालिका प्रशासनाने मृत साठा उचलण्यासाठी पाऊल उचलणे गरजेचे असून, नियोजन करण्याची गरज आहे.२००५ मध्ये केला होता मनपाने प्रस्ताव२००४-०५ मध्ये उद्भवलेल्या भीषण पाणी टंचाईनंतरअकोला शहराची कायमची पाण्याची व्यवस्था करण्यासाठी तत्कालीन मनपा आयुक्तांनी या दोन्ही धरणातून पाणी आणण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला होता. अप्पर वर्धा धरणाची जलवाहिनी कुरू मपर्यंत असल्याने येथून सहज जलवाहिनी टाकता येऊ शकते.

 

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरणwater scarcityपाणी टंचाई