शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

नेर-धामणा बॅरेजमध्ये जलसंचय; जलसिंचन संघर्ष समितीने केले जलपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 16:05 IST

या बॅरेजमध्ये जलसंचय झाल्याने जलसिंचन संघर्ष समिती व परिसरातील ग्रामस्थांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

अकोला: पूर्णा नदीवरील नेर-धामणा बॅरेजमध्ये प्रथमच या वर्षापासून जलसंचय झाल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थांना आनंद झाला; पण हे पाणी प्रत्यक्ष शेतात पोहोचेल तेव्हा आमचा आनंद द्विगुणित होईल, असे भावपूर्ण प्रतिपादन अकोला जिल्हा जलसिंचन संघर्ष समितीचे अध्यक्ष महादेवराव भुईभार यांनी रविवारी केले.नेरधामणा पूर्णा बॅरेजला पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी भेट देऊन जलपूजन केले त्याप्रसंगी ते बोलत होते. खारपाणपट्ट्यातील भीषण पाणीटंचाईवर उपाय म्हणून २००८ साली जिल्ह्यातील मंगरुळकांबे, घुंगशी, नेरधामणा, उमा नदीवरील रोहणा बॅरेजच्या कामाला प्रारंभ झाला. २०१२ साली पूर्ण होणाऱ्या या बॅरेजची कामे प्रलंबित झाली. तेव्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आमसभेत महादेवराव भुईभार यांनी बॅरेजचा प्रश्न उपस्थित केला. सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन अकोला जिल्हा जलसिंचन संघर्ष समिती स्थापन केली. वारंवार निवेदन देऊन धरणे दिले. जनसामान्यांच्या रेट्याने व जलसिंचन संघर्ष समितीच्या पाठपुराव्यामुळे पाणी प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्यपालांनी या बॅरेजला भेट देऊन समितीचे अध्यक्ष महादेवराव भुईभार, उपाध्यक्ष शिरीष धोत्रे, सचिव भाई प्रदीप देशमुख, प्रा. बोर्डे, अ‍ॅड. रामसिंह राजपूत, बबनराव कानकिरड यांच्यासोबत चर्चा करून या बॅरेजची कामे तत्काळ पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. अनेक संकटांवर मात करीत २०१९ मध्ये या बॅरेजमध्ये जलसंचय झाल्याने जलसिंचन संघर्ष समिती व परिसरातील ग्रामस्थांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. बॅरेजच्या नदीपात्रात पाणी पाहून आनंद होतो; पण पूर आला की बॅरेजच्या दोन्ही बाजूची माती वाहून जाते, पुढे शेतात, गावात पाणी शिरले, नदीकाठचे रस्ते बंद झाले, पाइपलाइनने शेतापर्यंत पाणी येणार होते, ती कामे अद्याप अपूर्णच आहेत, अशा तक्रारी ग्रामस्थ मांडत आहेत.वºहाडला सोन्याची कºहाड म्हटले जाते. प्रत्यक्षात खारपाणपट्टा अनेक वर्षांपासून पाणी टंचाईशी झुंज देत आहे. संघर्ष करत असताना पूर्णा पात्रात पयोष्णी पाहून आता शेतकºयांच्या शेतात पाणी पोहोचेल. गोरगरिबांच्या, गुराढोरांच्या पिण्याच्या पाण्याची, शेती सिंचनाची सुविधा होत आहे. हा अवघ्या खारपाणपट्टावासीयांसाठी आनंदाचा वर्षाव असल्याचे भावोद्गार शेकापचे भाई प्रदीप देशमुख यांनी काढले. जलपूर्णा जलपूजनप्रसंगी शाखा अभियंता देशमुख, सहायक अभियंता सैतवाल, बबनराव कानकिरड, मोहन पाटील भांबेरे, विजय भांबेरे, दिनकरराव भांबेरे, अ‍ॅड. रामराव पाटील (सांगवी), बंडूभाऊ मोडक (गोपाळखेड) यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते. 

टॅग्स :AkolaअकोलाNer-Dhamna Barrageनेरधामणा बॅरेज