शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
3
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
4
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
5
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
6
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
10
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
11
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
12
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
13
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
14
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
15
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
20
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
Daily Top 2Weekly Top 5

व-हाडातील टंचाईग्रस्त गावांतील जलस्रोत विकास होणार!

By admin | Updated: February 24, 2015 00:26 IST

विदर्भाला मिळाले १८ कोटी.

अकोला : विदर्भातील टंचाईग्रस्त जिल्ह्यांतील जलस्रोतांच्या विकासासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना (आरकेव्हीवाय) तसेच महात्मा फुले जल, भूमी संधारण अभियानातून विदर्भासाठी १८ कोटीपेक्षा जास्त रुपयांचा निधी शनिवारी उपलब्ध झाला. अकोला जिल्ह्याला १.९५ कोटी रूपये प्राप्त झाले असून, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामावर कृषी विभागाकडून हा निधी खर्च केला जाणार आहे. महसूल विभागाने ५0 टक्क्य़ांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर केलेल्या टंचाईग्रस्त गावांमध्ये जलस्रोत विकसित करण्यात येणार आहेत. याकरिता शासनाने विदर्भाला १८ कोटींहून अधिक निधी दिला असून, यात अकोला जिल्हा १ कोटी ९५ हजार, बुलडाणा २ कोटी २३ लाख ९९ हजार, वाशिम १ कोटी २१ लाख ५0 हजार, अमरावती २ कोटी ८२ लाख २८ हजार, यवतमाळ ३ कोटी १ लाख ६६ हजार, वर्धा १ कोटी ८४ लाख ९३ हजार, नागपूर २ कोटी ६७ लाख १५ हजार, भंडारा ६९ लाख ६३ हजार, गोंदिया ६0 लाख ९८ हजार, चंद्रपूर २ कोटी २७ लाख ३८ हजार आणि गडचिरोली जिल्ह्याला ९९ लाख ३४ हजार रुपये मंजूर झाले आहेत. या अभियानांतर्गत पाझर तलाव, माती नालाबांध, सिमेंट नालाबांध, गावतलाव, शिवकालीन तलाव, डोह आदी स्रोतांचा विकास केला जाणार असून, विहीर पुनर्भरण, विहीर व जलस्रोत खोल करू न सलग समतल चर या कामांवर भर दिला जाणार आहे. टंचाईग्रस्त गावांतील पाझर, गाव व साठवण तलाव, शिवकालीन, ब्रिटिशकालीन, निजामकालीन तलावांतील गाळ काढला जाणार आहे. ही कामे करताना जिथे लोकसहभाग मिळणार नाही, तिथे यंत्राने कामे केली जातील. त्याकरिता केवळ डिझेलसाठी निधी देण्यात येईल. जलस्रोतील गाळ लोकसहभागातून काढल्यानंतर त्या जलस्रोत विकासासाठी निधी दिला जाईल. जिथे पाणलोट क्षेत्रात जलस्रोत नसेल, तिथे डोंगर उतारावर सलग समतल चर काढले जातील. शेतातील माती वाहून जाऊ नये, याकरिता शेतकर्‍यांना नव्याने मार्गदर्शन केले जाणार असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक प्रमोद लहाळे यांनी सांगीतले. अकोला जिल्ह्याला १ कोटी ९५ लाख मंजूर झाले असूून, या निधीतून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलस्रोत विकासकामांना सुरुवात होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.