Waiting for help of 41 thousand farmers in Balapur taluka | बाळापूर तालुक्यातील ४१ हजार ५३३ शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा
बाळापूर तालुक्यातील ४१ हजार ५३३ शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा

- अनंत वानखडे  
लोकमत न्यूज नेटवर्क
बाळापूर : परतीच्या पावसाने तालुक्यातील शेतपिकांचे १00 टक्के नुकसान झाले आहे. या पिकांच्या नुकसानाचे सर्वेक्षण झाले असून, बाळापूर तालुक्यातील ४१ हजार ५३३ शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे.
गेल्या ३ वर्षांपासून कोरड्या दुष्काळाने होरपळलेल्या शेतकºयाने याही वर्षी खरीप हंगामासाठी पीक कर्ज, सावकाराकडील कर्ज, उसणवारी करून खरीप हंगामात पिकांची पेरणी केली. मोठ्या आशेने पिकावर कर्जाची परतफेडीचे स्वप्न पाहत असताना परतीच्या पावसाने शेतकरी अक्षरश: कोलमडला आहे. तोंडाशी आलेला पिकांचा घास १५ दिवसांच्या पावसाच्या झडीने अक्षरश: हिरावला गेला आहे. खरीप हंगामात संपूर्ण जवळची रक्कम संपल्याने पुन्हा रब्बी हंगामासाठी पैसा कोठून आणायचा, संपूर्ण वर्षाचा खर्च कसा भागवायचा, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.
तालुक्यातील ४१ हजार १३३ शेतकºयांच्या ५४ हजार ८८२.२३ हेक्टरवरील पिकांचे नुकसानाचा पंचनामा पूर्ण करण्यात आला. खरीप पिकासाठी घेतलेले पीक कर्ज काढून मूग, कापूस, सोयाबीन, उडीद, तूर पिके पेरली त्याला लागणारी खते, पेरणी, डवरणी, फवारणी करून मेहनतीने शेतात हिवरे पिके डोलत असताना निसर्गाने शेतकºयांचा तोंडचा घास पळविला. शेत पिके झाडावरच सडल्याने सोयाबीन काळे पडून रंगहीन झाले व अर्ध्यापेक्षा जास्त शेतातच पडले. त्यामुळे काढणीचा खर्चही निघत नाही. डागी सोयाबीनला नाफेड खरेदी करीत नाही. त्यामुळे नाफेडच्या खरेदी केंद्रावर शुकशुकाट आहे. त्याचा गैरफायदा घेत व्यापारी मातीमोल भावात शेतकºयाचे सोयाबीन, उडीद, खरेदी करीत आहे. यावर नियंत्रण ठेवणारी बाजार समिती मात्र मूग गिळून बसली आहे. बाजार समितीचे परवाना नसलेले व्यापारी शेतकºयांच्या असाह्यतेचा गैरफायदा घेत असताना मात्र कुणीही शेतकºयांचा वाली पुढे येत नसल्याचे चित्र आहे.
तालुक्यात सुरुवातीपासूनच अतिवृष्टीमुळे नदी-नाल्या काठच्या शेतजमिनी शेत पिकासह खरडून गेल्या. यामध्ये तालुक्याचा उत्तर भागातील मोठ्या प्रमाणात शेत पिके वाहून गेली आहेत. तर काही क्षेत्रात शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पिके सडली, कापसाची झाडे जमिनीवर पडल्याने कापसातून कोंब बाहेर पडली. सोयाबीन, उडीद पिके पाण्याने सडल्याने शेतात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी परसली आहे. हातात आलेली पिके घरी आणण्यासाठी शेत रस्ते नसल्याने शेतात लावलेल्या गंज्यावरच पाण्याने कोंब आले आहेत. शेतकºयाने निसर्गाच्या मारासोबत शासनकर्त्यांचे शेतीसाठी नसलेल्या नियोजनाचा मार शेतकºयांना सहन करावा लागत आहे. तालुक्यातील ४१,५३३ शेतकºयांनी ५९,८0५ हेक्टर क्षेत्र खरीप पिकांसाठी लागवडीखाली आणले. कापूस क्षेत्र २७ हजार ८५२.१३ हेक्टर, सोयाबीन २0 हजार 00५.४७ हेक्टर, ज्वारी ३ हजार ५0३.१५ हेक्टर, इतर पिके ३ हजार ५१९.४८ हेक्टर एकूण क्षेत्रापैकी ५४ हजार ८८२.२३ हेक्टर यामध्ये बाधित नुकसानीचे क्षेत्र आहे. खरडून गेलेल्या शेतपिकांचे पंचनामेच नाहीत. अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना आलेल्या महापूर व शेतात साचलेल्या पावसाच्या पाण्याने पिके सडली. पिके वाहून गेली, जमीन खरडून गेली; मात्र याचा कुठला सर्व्हे नसल्याने शेतकरी प्रशासनाच्या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह करीत आहे. खरडून गेलेल्या शेतजमिनीचे सर्वेक्षण करण्याच्या मागणीचे निवेदने शेतकºयांनी तालुका प्रशासनाला दिली; परंतु निवडणुकीच्या कामाबाबत व्यस्त असल्याचे अधिकारी सांगून सर्वेक्षणाला पाठ फिरवली आहे.

 

Web Title: Waiting for help of 41 thousand farmers in Balapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.