शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाच्या प्रशिक्षणाला ९३ कर्मचाऱ्यांची दांडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 12:26 IST

या प्रशिक्षणात १ हजार ३९१ मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी कर्मचाºयांनी सहभाग घेतला असून, ९३ कर्मचाºयांनी मतदानाच्या प्रशिक्षणाला दांडी मारली.

अकोला : विधानसभा निवडणुकीसाठी अकोला पूर्व मतदारसंघातील मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकाºयांना रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात १ हजार ३९१ मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी कर्मचाºयांनी सहभाग घेतला असून, ९३ कर्मचाºयांनी मतदानाच्या प्रशिक्षणाला दांडी मारली.विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांत मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या मतदान पथकांतील मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाºयांना मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यामध्ये अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेचे दुसरे प्रशिक्षण १३ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात घेण्यात आले. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, उपविभागीय अधिकारी तथा अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. नीलेश अपार, तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विजय लोखंडे, तहसीलदार राहुल वानखडे यांनी प्रशिक्षणाला उपस्थित मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाºयांना ‘ईव्हीएम व व्हीव्हीपॅट’द्वारे मतदान प्रक्रियेसह अभिरूप मतदान (मॉक पोल) प्रक्रियासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच मतदान प्रक्रियेचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले. मतदानाच्या या प्रशिक्षणाला अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील एकूण १ हजार ४८४ मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाºयांपैकी १ हजार ३९१ मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी उपस्थित होते. उर्वरित ९३ मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी कर्मचाºयांनी मात्र प्रशिक्षणाला अनुपस्थित राहत प्रशिक्षणाला दांडी मारली. मतदानाच्या प्रशिक्षणाला दांडी मारणाºया संबंधित कर्मचाºयांना निवडणूक निर्णय अधिकाºयांमार्फत सोमवारी नोटीस बजावण्यात येणार असून, स्पष्टीकरण मागविण्यात येणार आहे.अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेच्या प्रशिक्षणाला अनुपस्थित राहिलेल्या संबंधित अधिकारी व कर्मचाºयांना सोमवारी नोटीस बजावण्यात येणार आहे व त्यांच्याकडून स्पष्टीकरण घेण्यात येणार आहे.-विजय लोखंडे,सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, अकोला पूर्व मतदारसंघ.

 

टॅग्स :AkolaअकोलाElectionनिवडणूक