शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

Vidhan Sabha 2019 : विदर्भ जिंकण्याचे वासनिकांपुढे आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 13:41 IST

काँग्रेसपुढील आव्हानांचा सामना करीत विजय मिळवून देण्यासाठी आता वासनिकांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.

- राजेश शेगोकार अकोला: एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या विदर्भात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ६२ पैकी ४४ जागांवर भाजपचे ‘कमळ’ फुलले तर अवघ्या १० जागांवर काँग्रेसला विजय मिळविता आला. या पृष्ठभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसपुढे आव्हानांचा डोंगर आहे. काँग्रेसने प्रथमच निवडणुकीसाठी विभागवार प्रभारींची निवड केली असून, विदर्भाची जबाबदारी ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांच्यावर देण्यात आली आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी ते सर्वात प्रबळ दावेदार होते. त्यामुळे काँग्रेसपुढील आव्हानांचा सामना करीत विजय मिळवून देण्यासाठी आता वासनिकांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.अ.भा. काँगे्रसचे ज्येष्ठ सरचिटणीस असलेल्या वासनिकांचा प्रवास बुलडाण्याचे खासदार ते दिल्लीच्या वर्तुळातील बडे प्रस्थ असा आहे. इंदिरा गांधीजींच्या नेतृत्वाचा अनुभव, राजीव गांधी, सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यासोबत प्रत्यक्ष काम मध्य प्रदेश, राज्यस्थान, बिहार व केरळ अशा अनेक प्रदेशांचे प्रभारी राहिलेल्या वासनिकांकडे सध्या लक्षद्वीप, पाँडेचरी, अंदमान व केरळ या राज्यांची जबाबदारी आहे. त्यांच्या या प्रभावी कारकिर्दीमुळेच त्यांचे नाव काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी सर्वाधिक चर्चेत होते. अखेरच्या क्षणी सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्षपद स्वीकारण्याची तयारी दर्शविल्यावर वासनिकांचे नाव मागे पडले. या पृष्ठभूमीवर वासनिकांना देण्यात आलेली विदर्भाची जबाबदारी त्यांच्या संघटन कौशल्याची परीक्षा ठरणार आहे.  पूर्व व पश्चिम या दोन्ही विभागांतून संसदेमध्ये प्रतिनिधित्व केलेल्या वासनिकांना उमेदवार निवडीपासूनच कसोटीला सामोरे जावे लागणार आहे. वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची केलेली उलथापालथ लक्षात घेता, या पक्षाच्या उंबरठ्यावर अनेक नेते आहेत. काँग्रेसने उमेदवारी नाकारली तर ‘वंचित’सोबत घरोबा करण्याची तयारी काहींनी करून ठेवली आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी होणाºया गटबाजीची लॉबिंग हाणून पाडत मेरिटवर उमेदवारी देण्यात वासनिक यशस्वी ठरले तर लढाईमधील पहिला टप्पा ते जिंकतील, अशी स्थिती आहे. काँग्रेसमध्ये त्यांच्या शब्दाला मोठी किंमत आहे. पश्चिम विदर्भात तर त्यांचा शब्द हा काँग्रेसमध्ये प्रमाण आहे. त्यामुळे या भागात जिंकलेल्या पाच जागा कायम ठेवत विजयाचा आकडा वाढविण्यासाठी त्यांना गटबाजी संपवावी लागणार आहे.  यवतमाळ व नागपुरातील गटबाजी सर्वश्रुत आहे. बुलडाण्यात चिखलीचे आमदार हे पक्षांतराच्या वाटेवर असल्याची चर्चा शमता शमत नाही. अकोला जिल्हा हा काँग्रेसमुक्त जिल्हा झाला आहे. दोन दशकांपासून काँग्रेसला हा हक्काचा आमदार मिळालेला नाही. मित्रपक्ष असलेल्या राष्टÑवादीमध्ये अनेक नेते हे वासनिकविरोधी आहेत. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा सर्वाधिक प्रभाव विदर्भात आहे. एक लोकसभा मतदारसंघ सोडला तर सर्व जागांवर भाजपा, शिवसेनेचा विजय झालेला आहे. त्यामुळे या सर्व आव्हानांचा सामना करीत मित्रपक्षांशी समन्वय ठेवून काँगे्रसला एकसंधपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात वासनिकांना कितपत यश येते, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष राहणार आहे.

टॅग्स :Mukul Wasnikमुकूल वासनिकMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसVidarbhaविदर्भAkolaअकोला