शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- बांधकाम मजुरांनी काढला अर्धनग्न मोर्चा !

By admin | Updated: December 26, 2016 14:54 IST

ऑनलाइन लोकमत अकोला, दि. 26 - शहरातील बांधकाम ठप्प असल्यामुळे व नोटाबंदीमुळे आधीच आर्थिक चणचण सहन करावी लागत असलेल्या ...

ऑनलाइन लोकमतअकोला, दि. 26 - शहरातील बांधकाम ठप्प असल्यामुळे व नोटाबंदीमुळे आधीच आर्थिक चणचण सहन करावी लागत असलेल्या बांधकाम मजुरांना कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीसाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र देण्यास मनपा प्रशासनाने नकार दिला आहे. त्यामुळे बांधकाम मजुरांच्या अडचणीत भरच पडली आहे. मनपा हद्दीत काम करणाऱ्या बांधकाम मजुरांना मनपा प्रशासनाने प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी बिल्डिंग पेंटर बांधकाम मजूर असोसिएशन व ग्रामीण बांधकाम मजूर असोसिएशनच्या वतीने सोमवारी अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्तांना निवेदन सादर करून आपल्या मागण्या मांडल्या.अकोला जिल्हा ग्रामीण बिल्डिंग पेंटर्स बांधकाम मजूर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, प्रशांत मेश्राम, अब्दुल बशीर, ग्रामीण अध्यक्ष गणेश हिरोळकर, रमेश आखरे, गणेश नृपनारायण यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी झालेल्या शेकडो बांधकाम मजुरांनी सहभाग नोंदविला. स्थानिक अशोक वाटीका येथून दुपारी २ वाजता मोर्चाला सुरुवात झाली. नोंदणी प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे, बांधकाम मजूर संघटना जिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मदनलाल धिंग्रा चौक, महात्मा गांधी मार्ग अशी माग्रक्रमणा करीत हा मोर्चा मनपा परिसरात पोहोचला. तेथे पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्तांना मागणीचे निवेदन सादर केले. मोर्चात युवराज खडसे, गौतम मोटघरे, सुरेश कारंडे, मनोज बाविस्कर, अनिल वाघमारे, आत्माराम साठे, गणेश सावळे, साबीर मौलाना, शेख जमीर, शेख लाल, श्रावण रंगारी, सतीष नागदिवे, गुलाब बल्लाळ, बाबुलाल डोंगरे, सतीश वाघ, सुनील तायडे, सुनील वंजारी, सुभाष तायडे, राजू किर्तक, भास्कर सोनोने, चेतन तिरपुडे, राजू सुरवाडे, मदन वासनिक, संदीप नरवणे, सुरेश बोदडे, गजानन लोखंडे, नामदेव निखाडे, सुनील इंगळे, राजू वानखडे यांच्यासह शेकडो बांधकाम मजूर उपस्थित होते.

https://www.dailymotion.com/video/x844mhx