मजूर घेऊन जात असलेले वाहन दरीत कोसळले; १९ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 18:28 IST2020-03-21T18:27:46+5:302020-03-21T18:28:13+5:30
मजुरांचे वाहन दरीत कोसळल्याने १९ जण जखमी झाले.

मजूर घेऊन जात असलेले वाहन दरीत कोसळले; १९ जखमी
हिवरखेड : मध्य प्रदेशातून कामासाठी अंजनगाव येथे जाणाऱ्या मजुरांचे वाहन दरीत कोसळल्याने १९ जण जखमी झाले. ही घटना २१ मार्च रोजी झरी बाजार रस्त्यावर घडली. जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
मध्य प्रदेशातून कामासाठी रगई गावातील मजूर एमएच २७ एक्स ५०५४ क्रमांकाच्या वाहनाने अंजनगाव येथे जात होते. दरम्यान, झरी बाजार रस्त्यावरील तेल्यादेवाजवळ सातपुडा पर्वातातील दरीमध्ये हे वाहन कोसळले. यामध्ये १९ जण जखमी झाले आहेत. रुग्णांना आणण्यासाठी झरी येथून नुरुद्दीन यांनी ट्रॅक्टरने प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणले. झरी बाजार येथील उमरसेठ, आमद सुरत्ने, सरपंच, पोलीस पाटील भिका सुरत्ने व गावकऱ्यांनी मदत केली. (प्रतिनिधी)