Vehicle sales wheels accelerate after unlock | 'अनलॉक'नंतर वाहन विक्रीची चाके गतीमान

'अनलॉक'नंतर वाहन विक्रीची चाके गतीमान

ठळक मुद्देदूचाकी, चार चाकीची विक्री वाढली

अकोला : कोविड-१९ विषाणूच्या प्रकोपामुळे झालेल्या लॉकडाऊनचा फटका सर्वच उद्योग, व्यवसायांना बसला. यातून आटोमोबाईल क्षेत्रही सुटलेले नाहीत. अनलॉकनंतर आटोमोबाईल क्षेत्राची चाके गतिमान होत असून येत्या नवरात्री, दसरा व दिवाळी या दिवसात दुचाकी, चारचाकी तसेच इतरही वाहनांची मागणी वाढण्याची शक्यता आहेत. २०१९ मधील सप्टेंबर महिन्यात झालेल्या वाहन विक्रीची तुलना यावर्षी केली असता वाहन विक्री दूप्पटीने वाढल्याचे दिसत आहे.
अनलॉकनंतर हळूहळू वाहनांच्या विक्रीला सुरुवात झाली आहे. बाजारपेठत गर्दी वाढत असून वाहन खरेदीचाही वेग वाढल्याचे दिसत आहे.
यामुळे उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या महसूलात भर पडत आहे. आता नवरात्री, दसरा व दिवाळी सण असल्याने या दिवसात वाहनांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. पण, लॉकडाऊनकाळात अनेकांचा रोजगार हिरावला, व्यावसायावरही परिणाम झाला तसेच निसर्गकोपाने शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे वाहन खरेदीकरिता ग्राहकांची संख्या अपेक्षेनुसार फारच कमी असल्याने वाहन विक्रेत्यांचीही चिंता चागलीच वाढली आहे.


दुचाकींचाच खप सर्वाधिक
जिल्'ात एकटया सप्टेंबर महिन्यात 1 हजार ७२८ दूचाकी वाहनांची उप प्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणी करण्यात आली आहे. हा आाकडा गेल्यावर्षीच्या तुलनेत दूप्पट आहे. विशेष म्हणजे चार चाकी वाहनांमध्ये कारची विक्री सवार्धीक आहे कोरोना नंतर ग्राहकांनी कार खरेदीकडे कल वाढिवल्याचे या निमित्ताने समोर आले आहे कोट कोरोनाकाळात मार्कटिंगमध्ये उतरलो त्यामुळे आता जास्त आवश्यकता असल्याने दुचाकी घ्यावी लागली. दूचाकीसाठी वेटींग नव्हते, आवडीचा रंग मिळाला तसेच बँकेचेही कर्ज सहज मिळाले त्यामुळे मोटार सायकल खरेदी केली. -रणजित जेठे

जानेवारी महिन्यातच कार घेण्याचा विचार होता मात्र राहून गेला नंतर कोरोनाचा उद्रेक झाला आता कुटूंबाच्या सुरक्षेच्यासाठी स्वताचे वाहन असणे आवश्यक वाटले त्यामुळे कार खरेदी केली बँकोचही व्याजदरही कमी झाले आहे त्याचाही फायदा झाला.

-अशोक काळे शेतीसाठी ट्रॅक्टरची गरज होतीच आता बँकाही कर्ज देण्यास तयार आहेत सीसीआयला कापूस विकला त्यामधून ट्रॅक्टर खरेदी करणे शक्य झाले . -जगन्नाथ इंगळे

ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद दरवर्षी नवरात्री, दसरा व दिवाळी या दिवसांमध्ये वाहनखरेदी करणाऱ्यांची गर्दी असायची. ती आता पुन्हा दिसेल असे संकेत आहेत गेल्या वष्ीर्च्या तुलनेत कार खरेदी ४० टक्यांनी वाढली आहे अनलॉक नंतर हे क्षेत्र उसळी घेईल यात शंका नाही

-वसंतबाबु खंडेलवाल , कार विक्रेते

 

 

Web Title: Vehicle sales wheels accelerate after unlock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.