वाहनचोरांची टोळी सक्रिय

By Admin | Updated: August 27, 2014 00:52 IST2014-08-27T00:52:01+5:302014-08-27T00:52:01+5:30

दोन दुचाकीसह वाहनातील बॅटरी पळविली

Vehicle activists active | वाहनचोरांची टोळी सक्रिय

वाहनचोरांची टोळी सक्रिय

अकोला : शहरातील सार्वजनिक ठिकाणांवर ठेवण्यात येत असलेल्या दुचाकी चोरणारी टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी शहराच्या विविध भागातून तीन दुचाक्यांसह एका वाहनातील बॅटरी चोर गेल्याने ही टोळी सक्रिय झाल्याचे स्पष्ट होत आहे. खोलेश्‍वर परिसरातील रहिवासी विनायक यशवंत बोरकर यांची एम.एच-30-ए.एम-1990 क्रमांकाची सुमारे ३0 हजार रुपये किमतीची दुचाकी १९ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता आरडीजी महिला महाविद्यालयासमोरून अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. यासोबतच अमानखॉ प्लॉट येथील रहिवासी अश्‍विन हिम्मतलाल खिलौसिया यांची एम.एच-30-एस-7103 क्रमांकाची सुमारे २0 हजार रुपये किमतीची दुचाकी १९ ऑगस्ट रोजी याच परिसरातून लंपास केली. तर तिसर्‍या घटनेमध्ये लहान उमरीतील सुनील इंद्रसिंह राजपूत यांनी आपली टाटा-सुमो क्रमांक एम.एच-30-ए.ए-5826 राहत्या निवासस्थानासमोर उभी केली. त्यामधील सुमारे १0 हजार रुपये किमतीची बॅटरी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. मलकापूर येथील रविंद्र ढगे यांची एमएच 30 एन ७६८७ क्रमांकाची दुचाकी मंगळवारी अज्ञान चोरट्यांनी लंपास केली. तीन दुचाक्यांसह एका वाहनातील बॅटरी १९ ऑगस्ट या एकाच दिवशी लंपास केली असून, या प्रकरणी सिव्हिल लाईन्स पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्धगुन्हा दाखल केला.

Web Title: Vehicle activists active

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.