शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

विद्यार्थ्यांना दूध भुकटी वाटपाचा प्रयोग फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 12:57 IST

अकोला: इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातील खिचडीसोबत प्रायोगिक तत्त्वावर तीन महिने दूध भुकटी देण्याचा निर्णय नऊ महिन्यांपासून कागदावरच ठेवण्याचा प्रकार घडला आहे.

- सदानंद सिरसाटअकोला: इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातील खिचडीसोबत प्रायोगिक तत्त्वावर तीन महिने दूध भुकटी देण्याचा निर्णय नऊ महिन्यांपासून कागदावरच ठेवण्याचा प्रकार घडला आहे. जिल्हास्तरावरून शाळांतीलविद्यार्थी, त्यांना देय पाकिटांची संख्या याची माहिती घेण्याच्या पलीकडे शासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. विशेष म्हणजे, विद्यार्थ्याला प्रत्येक महिन्यात २०० ग्रॅमचे एक पाकीट देण्याची तयारी शासनाने केली होती.शालेय पोषण आहार योजनेमध्ये दूध, दूध भुकटीचा समावेश करण्याच्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली. त्याबाबतचा शासन निर्णय २३ आॅगस्ट २०१८ रोजी प्रसिद्ध करण्यात आला. त्यामध्ये मंत्रिमंडळाच्या मान्यतेनुसार शालेय पोषण आहारास पूरक योजना म्हणून दूध भुकटी वाटप योजना राबवण्याचे ठरले. विद्यार्थ्यांना दूध भुकटी (स्किम मिल्क पावडर) देण्यासाठी शाळास्तरावर वाटप करण्याचे नियोजनही देण्यात आले. एक महिन्याच्या कालावधीसाठी २०० ग्रॅम दूध भुकटीचे पाकीट अशी तीन महिन्यांसाठी ६०० ग्रॅमची पाकिटे विद्यार्थ्यांना घरी देणे आवश्यक होते. त्या भुकटीपासून पालकांनी घरी दूध तयार करून देण्याची पद्धतही समजावून सांगण्याची जबाबदारी संबंधितांवर देण्यात आली. शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांची उपस्थितीत एकाच दिवशी वाटप करण्याची कार्यपद्धतीही ठरवण्यात आली.- शिक्षण संचालकांवर जबाबदारीराज्यात उत्पादित झालेल्या दूध भुकटी योजनेतून पाकिटांचा पुरवठा करण्यासाठी आदेश देणे, शालेय पोषण आहार योजनेंतर्गत राज्य हिश्शातून निधी खर्च करणे, या बाबीही ठरल्या. त्यासाठी राज्य समन्वय अधिकारी म्हणून राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालकांना जबाबदारी देण्यात आली. योजना पुढे सरकलीच नसल्याने लाखो विद्यार्थ्यांना दूध भुकटीपासून वंचित ठेवण्याचा प्रकार घडला आहे.- दूध उत्पादक, प्रकल्पांसाठी निर्णयमहाराष्ट्रातून दूध भुकटी व दुधाची निर्यात करणाऱ्या सहकारी, खासगी संस्थांना मदतीचा हात म्हणून ही योजना राबवण्याची तयारी शासनाने केली. त्यासाठी दूध संस्थांना अनुक्रमे भुकटीसाठी ५० रुपये प्रति किलो, दूधासाठी ५ रुपये लीटरप्रमाणे अनुदान देण्याच्या प्रस्तावाला १९ जुलै २०१८ रोजीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार अनुदान देय असलेल्या राज्यातील संस्थांकडून शालेय पोषण आहारांतर्गत दूध भुकटी खरेदी करून वाटप करण्याला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर हा निर्णय कागदावरच ठेवल्याचे गेल्या नऊ महिन्यांपासून उघड होत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळाStudentविद्यार्थी