शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

‘वंचित’ची आगामी निवडणूक ‘सिलिंडर’वर;  निवडणूक आयोगाने दिले चिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 15:03 IST

वंचित बहुजन आघाडीला आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी निवडणूक आयोगाने गॅस सिलिंडर हे चिन्ह प्रदान केले आहे.

अकोला : वंचित बहुजन आघाडीला आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी निवडणूक आयोगाने गॅस सिलिंडर हे चिन्ह प्रदान केले आहे. लोकसभा निवडणुकीत बहुतांश ठिकाणी कप-बशी या चिन्हावर वंचितचे उमेदवार रिंगणात होते. त्यावेळी ही कप-बशी भाजपाच्या पथ्यावर पडत काँग्रेसच्या घरात फुटली होती. त्यामुळे यावेळी वंचितच्या सिलिंडरमुळे कोणता पक्ष ‘गॅस’वर राहतो, याकडे लक्ष लागले आहे.वंचित बहुजन आघाडी राज्यातील २८८ जागांवर निवडणूक लढविण्यास सज्ज झाली असून, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांच्या नेतृत्वात पार्लमेंटरी बोर्ड विभागनिहाय दौरे करून संभाव्य उमेदवारांची चाचपणी करीत आहे. दुसरीकडे काँग्रेससोबतच्या आघाडीबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही; मात्र येत्या पंधरा दिवसांत वंचितच्या उमेदवारांची पहिली यादी अपेक्षित आहे. वंचितच्या उमेदवारांमुळे प्रत्येक मतदारसंघात तिरंगी लढत होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. या लढतीत वंचितचा उमेदवार कोण, यावरही मतदारसंघाचे समीकरण ठरणार असल्याने वंचितच्या उमेदवारीमुळे कोण ‘गॅस’वर जातो, हे काळच ठरवेल. दरम्यान, पक्षाने निवडणूक आयोगाकडे कप-बशी, किल्ली व शिटटी असे चिन्ह मागितले होते. त्यापैकी गॅस सिलिंडर हे चिन्ह प्रदान करण्यात आल्याची माहिती प्रवक्ते राजेंद्र पातोंडे यांनी दिली.

 

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीAkolaअकोलाPoliticsराजकारण