शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

अकोल्यातील जबरी चोरीच्या गुन्हय़ांची ठाणे पोलिसांकडून उकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 2:35 AM

अकोला : मुंब्रा येथील घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा पोलिसांनी अटक केलेल्या चार आरोपींनी अकोल्यातील दोन जबरी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. जवळपास दीड कोटी रुपयांची सोन्याची लुटमार या आरोपींनी केली होती. आरोपींना ताब्यात घेण्यासाठी रामदासपेठ पोलिसांचे एक पथक ठाण्याकडे रवाना झाले आहे. 

ठळक मुद्देचौघांना अटक चौघांना अटक : चोरट्यांचा ताब्यात घेण्यासाठी रामदासपेठ पोलीस रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मुंब्रा येथील घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा पोलिसांनी अटक केलेल्या चार आरोपींनी अकोल्यातील दोन जबरी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. जवळपास दीड कोटी रुपयांची सोन्याची लुटमार या आरोपींनी केली होती. आरोपींना ताब्यात घेण्यासाठी रामदासपेठ पोलिसांचे एक पथक ठाण्याकडे रवाना झाले आहे. मुंब्रा येथील एका घरफोडीच्या आरोपींची माहिती गुन्हे अन्वेषण शाखा पोलिसांना मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने नागपूर आणि मुंबईच्या जव्हेरी बाजार भागात शोध घेऊन चौघांना अटक केली. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील खापरखेडा येथील भागीरथ रामस्वरूप खरगयाल (३0), कामठी तालुक्यातील बिरजू भीमराव चहादे (२७), विनय गणेश भोयर (३२) आणि लक्ष्मण रामकिसन पाटील (३८) यांना अटक केली. या चौघा आरोपींची कसून चौकशी केल्यावर भागीरथ रामस्वरूप खरगयाल आणि लक्ष्मण रामकिसन पाटील यांनी कामठी येथील मोनू मनपिया, आकाश माहतो आणि उत्तर प्रदेशातील अजय नामक आरोपीसोबत मुंब्रा येथील घरफोडीसोबतच अकोल्यातील रेल्वे स्टेशन चौकातून २0१५ मध्ये कुरियरने सराफा व्यापार्‍यांचे आलेले ७५ लाख रुपये किमतीचे सोने आणि २0१७ मधील रेल्वे स्टेशन चौकातच शस्त्राच्या धाकावर एका इसमाकडून ६७ लाख ५0 हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची कबुली दिली. या दोन्ही प्रकरणात रामदासपेठ पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. या आरोपींना न्यायालयाने १४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अकोल्यातील दोन्ही गुन्हय़ात या आरोपींचा समावेश असल्याने, त्यांना ताब्यात घेण्यासाठी रामदासपेठ पोलिसांचे एक पथक एपीआय प्रेमानंद कात्रे यांच्या नेतृत्वात ठाण्यासाठी रवाना झाले आहे. 

सोने लुटमार प्रकरणातील आरोपीठाणे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी रेल्वेगाडीने कुरियरमार्फत आलेले ७५ व ६७ लाख रुपये किमतीचे सोने कुरियर कंपनीचे कर्मचारी घेऊन जात असताना, आरोपींनी शस्त्राच्या धाक दाखवून हे सोने लुटले होते. या प्रकरणात रामदासपेठ पोलिसांनी गुन्हादेखील दाखल केला होता. दोन ते तीन वर्ष उलटूनही या गुन्हय़ांतील आरोपी शोधण्यात अकोला पोलिसांना अपयश आले. त्यामुळे या दोन्ही गुन्हय़ांचा तपास थंड बस्त्यात पडला होता. परंतु, आता ठाणे पोलिसांनी या दोन्ही जबरी चोरीच्या गुन्हय़ांची उकल केल्यामुळे अकोला पोलिसांना आरोपींकडून गुन्हय़ातील सोने जप्त करण्यात कितपत यश मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

टॅग्स :Akola cityअकोला शहरArrestअटकCrimeगुन्हा