अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक ; एक ठार, दोन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 18:33 IST2019-04-01T18:33:19+5:302019-04-01T18:33:22+5:30

दिग्रस बु. (अकोला) : भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने एक जण जागीच ठार तर महिलेसह दोन जण गंभीर जखमी झाले.

Unknown vehicle hit a two-wheeler; One killed, two serious | अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक ; एक ठार, दोन गंभीर

अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक ; एक ठार, दोन गंभीर

दिग्रस बु. (अकोला) : भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने एक जण जागीच ठार तर महिलेसह दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना ३१ मार्च रोजी रात्री १० वाजता दिग्रस बु. ते तुलंगा मार्गावर घडली. भास्कर यादव तिडके (५५) रा. तुलंगा असे मृताचे नाव आहे.
तुलगा बु. येथील सूरज संतोष दाभाडे (२२), भास्कर यादव तिडके आणि अन्नपूर्णा तिडके हे तिघे ३१ मार्च रोजी रात्री १० वाजता दुचाकीने वाडेगाव येथे जात होते. दरम्यान, तुलंगा ते दिग्रस रस्त्यावर त्यांच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यामध्ये भास्कर यादव तिडके यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तसेच सूरज संतोष दाभाडे व अन्नपूर्ण तिडके हे गंभीर जखमी झाले. दोन्ही जखमींवर वाडेगाव येथील प्राथमिक केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेने सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे पाठवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच चान्नी पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा करण्यात आला. पुढील तपास चान्नी पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)

 

Web Title: Unknown vehicle hit a two-wheeler; One killed, two serious