अकोला रेल्वे स्थानकावर अज्ञात व्यक्तीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 18:02 IST2019-06-07T18:02:21+5:302019-06-07T18:02:29+5:30

अकोला : एका २४ वर्षीय माथेफीरू युवकाने अकोला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चार वरील बाकड्यावर झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यात लोखंडी पाईपने वार करून खून केला.

Unknown person's Murderd at Akola railway station | अकोला रेल्वे स्थानकावर अज्ञात व्यक्तीचा खून

अकोला रेल्वे स्थानकावर अज्ञात व्यक्तीचा खून

अकोला : एका २४ वर्षीय माथेफीरू युवकाने अकोला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चार वरील बाकड्यावर झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यात लोखंडी पाईपने वार करून खून केला. ही घटना शुक्रवार ७ जून रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली. तासाभरातच आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले.
प्राप्त माहितीनुसार, अकोला रेल्वे स्थानकावर नेहमी प्रमाणे शुक्रवारीही सकाळपासूनच प्रवाशांची गर्दी वाढू लागली होती. सकाळी प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरील एका बाकड्यावर एक व्यक्ती झोपलेला होता. सकाळी ९ वाजताच्या दरम्यान एका २५ वर्षीय माथेफीरू एल. भेन नामक युवकाने अचानक त्याच्या डोक्यावर व चेहऱ्यावर लोखंडी पाईपने वार केला. या घटनेमुळे प्रवाशी गोंधळले अन् धावपळ सुरू झाली. या घटनेत बाकड्यावर झोपलेल्या व्यक्तीचा जागीच मृत्यु झाली. मृतकाची ओळख पटली नाही. मृतक हा रेल्वे स्थानकावरील भीकारी असल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपीने यासाठी रेल्वे स्थानक परिसरातीलच लोखंडी पाईपचा उपयोग केला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करुन पोलिसांनी आरोपीला अकोट फैल परिसरातून अटक केली. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी आरोपी विरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.

आरोपी झारखंडचा रहिवासी
घटनेतील आरोपी एल. भेन नावाचा युवक असून, तो झारखंड येथील रहिवासी आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीतून आरोपी हा मतीमंद असल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.

Web Title: Unknown person's Murderd at Akola railway station