शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: एका लग्नाची अनोखी गोष्ट, मराठा आंदोलनातच 'शुभ मंगल सावधान'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 17:31 IST

Maratha Reservation: आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने आज अकोट शहरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते. या आंदोनावेळी एका नवदाम्पत्याने लग्न लावून मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी

विजय शिंदे अकोट (अकोला) : आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने आज अकोट शहरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते. या आंदोनावेळी एका नवदाम्पत्याने लग्न लावून मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजीही केल्याचे आगळे-वेगळे चित्र पहायला मिळाले. एकीकडे आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले असताना, दुसरीकडे मराठा समाजातील या जोडप्याने शांतीप्रिय विवाहसोहळ्यातून सकारात्मक दर्शन घडवले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी गेल्या काही दिवसांपासून अवघा महाराष्ट्र पेटला आहे. आजही सर्वत्र जाळपोळ आणि हिंसक आंदोलन सुरु झाले आहे. क्रांतीदिनी अनेक ठिकाणी आंदोलन भरकटले असतानाच, अकोला जिल्ह्यातील अकोट येथे चक्का जाम आंदोलनावेळी मराठा समाजातील सकारात्मक दृष्टीकोन समोर आला. शिवाजी चौकातील आंदोलनस्थळी अकोट तालुक्यातील देऊगांव येथील हरिदास गावंडे यांची मुलगी तेजस्विनी व गांधीग्राम येथील पांडुरंग अढाऊ यांचा मुलगा अभिमन्यू यांचा विवाह सोहळा थाटात पार पडला. यावेळी आंदोलनाचे स्वरुप विवाह सोहळ्यामध्ये काही काहीसाठी रुपांतरीत झाल्याचे दिसून आले. या आंदोलनात दोन्ही कुटुबीयांकडील वऱ्हाडी मंडळी सहभागी झाली होती. मराठा समाजाला आरक्षण द्या, या मागणीसह मंगलाष्टके पार पडली. वर-वधुंनीसुध्दा मराठा आरक्षणाचा नारा दिला. सदर विवाह सोहळा हा स्थानिक कास्तकार भवन या ठिकाणी 9 ऑगस्ट रोजी सकाळी पार पडणार होता. परंतु, दोन्ही कुटुंबीयांनी कास्तकार भवन असतानाही आंदोलनात सहभागी होऊन विवाह सोहळा करण्याचे ठरविले. या दोन्ही कुटुंबीयांच्या निर्णयाला सर्वच पाहुणे मंडळींनी होकार देत आंदोलनात सहभागी होऊन मराठा समाजातील सकारात्मक विचारसरणीचा संदेश दिला. 

पाहा व्हिडिओ -

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठाMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद