अज्ञात वाहनाने पादचाऱ्यास चिरडले, डोक्याचा चेंदामेंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 10:40 IST2021-05-25T10:36:23+5:302021-05-25T10:40:42+5:30

Accident News : पैलपाडा नजीक एका पादचारी ५० वर्षिय अनोळखी इसमास चिरडल्याची घटना मंगळवारी रात्री दरम्यान घडली.

An unidentified vehicle crushed a man on Highway near Borgaon manju | अज्ञात वाहनाने पादचाऱ्यास चिरडले, डोक्याचा चेंदामेंदा

अज्ञात वाहनाने पादचाऱ्यास चिरडले, डोक्याचा चेंदामेंदा

ठळक मुद्देडोक्यावरून अज्ञात वाहन गेल्याने सदर इसमाचा मृत्यू झाला.पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात वाहन चालका विरूद्ध गुन्हा दाखल केला.

लोकमत न्यूज नेटवर्क

बोरगाव मंजू : राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पैलपाडा नजीक एका पादचारी ५० वर्षिय अनोळखी इसमास चिरडल्याची घटना मंगळवारी रात्री दरम्यान घडली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अज्ञात वाहन चालका विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरगाव मंजू ते मुर्तिजापूर महामार्गावर पैलपाडा नजीक एका ५० वर्षीय इसमास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला.   घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सुनील सोळंके, हेड कॉन्स्टेबल संचेद्र पंचवटकर सुदिप राऊत यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर घटनेचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला. .घटनेची फिर्याद अजमुद्दिन रियाजोद्दीन रा.कुरणखेड यांनी दिली. पोलिसांनी अज्ञात वाहन चालका विरूद्ध गुन्हा दाखल केला.   सदर इसम अनोळखी वय अंदाजे ५० वर्ष, अंगात पांढरा शर्ट,काळा रंगाचा पॅन्ड परिधान आहे.  सदर इसमाच्या डोक्यावरून अज्ञात वाहन गेल्याने सदर इसमाचा मृत्यू झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.   इसमाची ओळख पटवीण्याचे आवाहन बोरगाव मंजू पोलिसांनी केले आहे.अज्ञात वाहनाचा पोलिस शोध घेत आहेत

Web Title: An unidentified vehicle crushed a man on Highway near Borgaon manju