अनोळखी इसमाचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2021 16:38 IST2021-08-30T16:38:18+5:302021-08-30T16:38:30+5:30

Murtijapur News : अनोळखी इसमाचा रेल्वे ने चिरडून मृत्य झाल्याची घटना सकाळी ६:३० वाजताच्या दरम्यान रेल्वे डाऊन लाईनवर घडली. 

An unidentified Isma was crushed to death under a train | अनोळखी इसमाचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू

अनोळखी इसमाचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू

मूर्तिजापूर : रेल्वे स्टेशन परिसरात ४०वर्षीय अनोळखी इसमाचा रेल्वे ने चिरडून मृत्य झाल्याची घटना सकाळी ६:३० वाजताच्या दरम्यान रेल्वे डाऊन लाईनवर घडली. 

             रेल्वे विभागात कार्यरत असलेल्या ट्रक मॅन समीर यांना रेल्वे लाईन वर मृतदेह दिसल्याची माहिती देताच रेल्वे पोलीस सहायक उपनिरीक्षक राजेंद्र जळमकर पोलीस कॉन्स्टेबल तायडे, वाटाणे हे घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता सदर अनोळखी इसमाचा चेहरा छिन्न विच्छिन्न झालेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्या हातावर (नई)व त्रिशूलचे निशाण गोंदलेले असून अंगात निळ्या रंगाचे बनियान, भुरकट काथ्या रंगाचे अंडरवीयर, काळसर रंगाचा फुलपयांट,कंबरेत लाल काळा रंगाचा दोरा या वर्णनाचा अनोळखी इसम के. एम ६२०/पोल १६/१८ च्याजवळ चिरडल्याने मृत्यू झाल्यावरून सदर प्रकरणी रेल्वे पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: An unidentified Isma was crushed to death under a train