वाडेगाव येथे माकडांच्या कळपाने केला गर्भार माकडिणीवर हल्ला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:51 IST2017-12-26T00:51:02+5:302017-12-26T00:51:38+5:30

वाडेगाव (अकोला) : बसस्थानकाच्या मागे असलेल्या दिनेश चिंचोळकर यांच्या गोदामातील चिंचेच्या झाडावर, माकडांच्या कळपाने एका गर्भार माकडिणीवर जबर हल्ला चढविला व तिला जखमी केले. ही घटना सोमवार, २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता घडली.

undefined | वाडेगाव येथे माकडांच्या कळपाने केला गर्भार माकडिणीवर हल्ला!

वाडेगाव येथे माकडांच्या कळपाने केला गर्भार माकडिणीवर हल्ला!

ठळक मुद्देपरिसरातील नागरिकांनी कळपाला हुसकावून लावत वाचविला माकडिणीचा जीव

लोकमत न्यूज नेटवर्क
वाडेगाव (अकोला) : बसस्थानकाच्या मागे असलेल्या दिनेश चिंचोळकर यांच्या गोदामातील चिंचेच्या झाडावर, माकडांच्या कळपाने एका गर्भार माकडिणीवर जबर हल्ला चढविला व तिला जखमी केले. ही घटना सोमवार, २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता घडली. 
कळपातील माकडांनी हल्ला चढविताच आधीच पोटाशी एक पिल्लू घेऊन फिरणारी ही गर्भार माकडीण जीव मुठीत धरून सैरावैरा धावायला लागली. हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी हल्ला करणार्‍या माकडांच्या कळपाला हुसकावून लावले; मात्र तोपर्यंत हल्लेखोर माकडांनी माकडिणीला गंभीर जखमी केले होते. घडल्या प्रकारामुळे तिने उराशी कवटाळलेल्या पिल्लाचीही शुद्ध हरपली होती. एकंदर प्रकार शांत होताच नागरिकांनी तिला प्यायला पाणी व खायला हरभरा दिला. शरीरावर गंभीर जखमा झाल्याने माकडिणीला साधे उभे राहणेदेखील शक्य होत नसल्याने, वन विभागाचे अधिकारी कातखेडे यांना घटनेची माहिती दिल्याचे अनिरुद्ध घाटोळ यांनी सांगितले. 

Web Title: undefined