Uncle molestation of his niece! | मामानेच केला भाचीचा विनयभंग!
मामानेच केला भाचीचा विनयभंग!

ठळक मुद्देमध्यप्रदेशातील एक १६ वर्षीय युवती लग्नसमारंभासाठी तिच्या कुटुंबीयासोबत आली होती. कुटुंबासह असताना तिच्याच सख्ख्या मामाने तिच्याशी गोड बोलून लगट साधली. यासंदर्भात युवतीने मामाला चांगलेच सुनावत घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला.

अकोला: मध्यप्रदेशातील एक १६ वर्षीय युवती लग्नाच्या निमित्ताने शहरात आली असता मंगलकार्यालयात उपस्थित असताना तिच्याच सख्ख्या मामाने भाचीचा विनयभंग केल्याची घटना १५ मे रोजी उघडकीस आली. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्यप्रदेशातील एक १६ वर्षीय युवती लग्नसमारंभासाठी तिच्या कुटुंबीयासोबत आली होती. ती एका मंगलकार्यालयात कुटुंबासह असताना तिच्याच सख्ख्या मामाने तिच्याशी गोड बोलून लगट साधली. तिला हे विचित्र वाटत असताना मामा असे काही करू शकेल असे तिला वाटत नव्हते; मात्र युवतीच्या निमूटपणाचा फायदा घेत मामाने तिचा विनयभंग केला. यासंदर्भात युवतीने मामाला चांगलेच सुनावत घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. हा प्रकार समोर येताच मामा व त्यांची पत्नी यांनी वाद केल्याने युवतीने थेट पोलीस स्टेशन गाठले. युवतीच्या तक्रारीहून सिटी कोतवाली पोलिसांनी पती-पत्नीविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४, एडी ५०४, ४३ आयपीसी पास्को ७, ८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.

 


Web Title: Uncle molestation of his niece!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.