अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 11:11 IST2020-10-31T11:11:28+5:302020-10-31T11:11:57+5:30
Accident, Murtijapur जयवर्धन वामनराव वाघ (२८) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
मूर्तिजापूर : तालुक्यातील जांभा बु. येथील रहिवासी असलेला युवक आपल्या दुचाकीवरून घरी परत जात असताना जितापूर नाकट रेल्वे क्रॉसिंगवर अज्ञात वाहनाच्या धडकेत तो घटनास्थळीच ठार झाला. घटना २९ ऑक्टोबरच्या रात्री १० वाजताच्या दरम्यान घडली, जयवर्धन वामनराव वाघ (२८) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मूर्तिजापूर येथून काम आटोपून एमएच ३० एएल ५०११ या क्रमांकाच्या दुचाकीने जयवर्धन गावी जांभा बु. येथे परत जात असताना मूर्तिजापूरनजीक जितापूर रेल्वे क्रॉसिंगवर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर तो शकुंतला रेल्वे रुळावर पडून असल्याची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांसह रुग्णवाहिका चालक सेनापती शेवतकार यांनी घटनास्थळी जाऊन जयवर्धन याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.