अकोला-अमरावती महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2021 15:37 IST2021-10-31T15:35:46+5:302021-10-31T15:37:08+5:30
Accident News : पुरुषोत्तम देवराव मालधुरे (६०) राहणार सिपगाव असे मृतकाचे नाव आहे.

अकोला-अमरावती महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्गावरील नागोली - नागठणा फाटा जवळ झालेल्या अपघात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना ३१ अॉक्टोबर रोजी सकाळी १०:३० वाजताच्या दरम्यान घडली. पुरुषोत्तम देवराव मालधुरे (६०) राहणार सिपगाव असे मृतकाचे नाव आहे.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सिपगाव येथील येथील पुरुषोत्तम देवराव मालधुरे (६०) हे आपल्या दुचाकी क्रमांक एमएच २७ एपी २०७८ ने मूर्तिजापूर येथे नातेवाईकाच्या अंत्ययात्रेसाठी येत होते, परंतु राष्ट्रीय महामार्गावरील ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नागोली - नागठणा फाट्या जवळ दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच येथील वंचित आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा आणला. पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.