शेगाव-अकोट महामार्गावर कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 11:08 IST2021-04-11T11:07:01+5:302021-04-11T11:08:21+5:30

Accident News : बळीराम भीमराव बघे (रा.पिवंदळ, ता.तेल्हारा) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

Two-wheeler killed in car crash on Shegaon-Akot highway | शेगाव-अकोट महामार्गावर कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

शेगाव-अकोट महामार्गावर कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

ठळक मुद्देनिंबा फाट्यानजीकची घटनासंतप्त नातेवाइकांनी पेटवली कार

निंबा फाटा : शेगावहून अंदुराकडे येत असलेल्या कारने दुचाकीस धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना निंबा फाट्यानजीक शनिवार, दि.१० एप्रिल रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. बळीराम भीमराव बघे (रा.पिवंदळ, ता.तेल्हारा) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. दरम्यान, संतप्त नातेवाइकांनी कार पेटवून दिली. पोलिसांची घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.

शेगाव-अकोट महामार्गावर शेगावहून अंदुराकडे जात असलेल्या कार क्रमांक (एम.एच. ०४ सी.टी. ७८०५)ने विरुद्ध दिशेने येत असलेल्या दुचाकी क्र. (एम.एच २८ ए.डी. ४६९९)ला जबर धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, दुचाकी जवळपास १०० फूट कारने फरफटत नेली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच, उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार वडतकर यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथे पाठविण्यात आले. जखमींना उपचाराकरिता पाठविण्यासाठी संजय रोहणकार, संदीप दामोदर, अनंता घुले, गणेश कदम यांनी मदत केली. दरम्यान, घटनास्थळी दाखल झालेल्या मृतकाच्या नातेवाइकांना घटनास्थळी उभ्या असलेल्या कारला आग लावली होती. त्यामुळे घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ठाणेदार वडतकर, जयेश शिणगारे, मेहेंगे यांनी नातेवाइकांची समजूत काढून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. वृत्त लिहोत्सर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. (फोटो)

Web Title: Two-wheeler killed in car crash on Shegaon-Akot highway