ट्रॅक्टरची दुचाकीस धडक, एक ठार, एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 17:31 IST2019-05-25T17:31:31+5:302019-05-25T17:31:35+5:30
जामठी बु. ( अकोला ) : भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीस धडक दिल्याने एक युवक ठार तर एक गंभीर जखमी झाला. ही घटन २५ मे रोजी जामठी बु. ते जामठी फाटा दरम्यान खरकाडी नाल्याच्या जवळ घडली.

ट्रॅक्टरची दुचाकीस धडक, एक ठार, एक गंभीर
जामठी बु. ( अकोला ) : भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीस धडक दिल्याने एक युवक ठार तर एक गंभीर जखमी झाला. ही घटन २५ मे रोजी जामठी बु. ते जामठी फाटा दरम्यान खरकाडी नाल्याच्या जवळ घडली. पवन सुभाष किर्दक (२०) रा.कार्ली असे मृतक युवकाचे नाव आहे.
कार्ली येथील पवन किर्दक आणि सतीश दुर्योधन किर्दक (२२) हे शनिवारी गॅस सिलिंडर आणयासाठी दुचाकी क्र.एमएच ३०-२५६६ ने जात होते. जामठी बु ते जामठी फाटा दरम्यान असलेल्या असलेल्या खरकाडी नाल्याजवळ समोरून येत असलेल्या ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३७ - १४३२ ने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. यामध्ये पवन किर्दक आणि सतीश किर्दक हे गंभीर जखमी झाले.घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि माना पोलिसांनी जखमींना तातडीने सर्वोपचार रुग्णालय अकोला दाखल केले.उपचारादरम्यान पवन किर्दक या युवकाचा मृत्यू झाला. या अपघातातील गंभीर जखमी सतीश किर्दक याच्यावर उपचार सुरू आहेत.अपघाताची माहिती मिळताच कार्ली गावातील काही युवक घटनास्थळावर आले होते. यावेळी संतप्त झालेल्या युवकांनी ट्रॅक्टर जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, माना पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत दोन्ही अपघातग्रस्त वाहने पोलिस स्टेशनला लावली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण पाटील यांचे मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल पंजाब इंगळे व त्यांचे सहकारी करित आहेत.(वार्ताहर)