दुचाकीची धडक, वृध्द ठार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2020 19:38 IST2020-11-15T19:38:27+5:302020-11-15T19:38:44+5:30
किसनराव शामराव मुगल हे शुक्रवारी रात्री ८ वाजता गोरेगाव ते मुर्तिजापूर रोडने शेतात रखवालीसाठी पायी जात होते.

दुचाकीची धडक, वृध्द ठार !
मंजू: बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोरेगाव येथील ६० वर्षिय वृध्दाला दुचाकीने जबर दिल्याची घटना १३ नोव्हेंबर रोजी शुक्रवारी रात्री दरम्यान घडली. यात वृद्ध जागीच ठार झाला.
किसन मुगल रा.गोरेगाव असे मृतकाचे नाव आहे. गोरेगाव पुंडलिक महाराज येथील किसनराव शामराव मुगल हे शुक्रवारी रात्री ८ वाजता गोरेगाव ते मुर्तिजापूर रोडने शेतात रखवालीसाठी पायी जात होते. दरम्यान पाठीमागून भरधाव येणाऱ्या दुचाकीने त्यांना धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. दरम्यान नातेवाईकांनी उपचारासाठी मुर्तिजापूर येथील रुग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी किसन मुगल यांना मृत घोषित केले. दरम्यान घटनेची फिर्याद रुपराव मुगल यांनी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी दुचाकीस्वार संकेत चोपडेविरूद्ध गुन्हा दाखल केला पुढील तपास ठाणेदार सुनील सोळंके, बिट जमादार श्रीवास करीत आहेत.