मालवाहू वाहनाची दुचाकीस धडक; एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 20:04 IST2020-11-23T20:04:09+5:302020-11-23T20:04:17+5:30

राहूल गणेश काकड (२४) राहणार कुपटी ता. कारंजा असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.

Two-wheeler collision with a cargo vehicle; One serious | मालवाहू वाहनाची दुचाकीस धडक; एक गंभीर

मालवाहू वाहनाची दुचाकीस धडक; एक गंभीर

मूर्तिजापूर : मूर्तिजापूर - कारंजा रोडवर मालवाहू वाहनाने दुचाकीस्वारास जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाला. ही घटना २३ नोव्हेंबर रोजी तुरखेड फाट्या जवळ सकाळी १० वाजताच्या दरम्यान घडली. राहूल गणेश काकड (२४) राहणार कुपटी ता. कारंजा असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.
          कारंजा तालुक्यातील कुपटी येथील रहिवासी २४ वर्षीय युवक अकोट  तालुक्यातील कुटासा येथे आपल्या बहिणीला घेण्यासाठी कुपटी येथून दुचाकी क्रमांक एमएच ३७ वाय ३२०६ ने  जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या मिनी मालवाहू वाहन क्रमांक एम एच २६ बीई ७१४ ने समोरासमोर जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार राहूल गणेश काकड (२४) हा गंभीररीत्या जखमी झाला घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीसांनी जखमीला येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले आहे. यासंदर्भात ग्रामीण पोलीस स्टेशन चे हेड कॉन्स्टेबल सुभाष उघडे, पोलीस शिपाई सयाम अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Two-wheeler collision with a cargo vehicle; One serious