दुचाकी चाेरीतील दाेन आराेपी गजाआड

By सचिन राऊत | Updated: November 24, 2023 18:14 IST2023-11-24T18:13:00+5:302023-11-24T18:14:54+5:30

दाेन्ही चाेरटयांना ताब्यात घेउन त्यांच्याकडून दाेन दुचाकी व मुद्देमाल जप्त.

Two-wheeled four-wheeler right-hand side in akola | दुचाकी चाेरीतील दाेन आराेपी गजाआड

दुचाकी चाेरीतील दाेन आराेपी गजाआड

अकाेला : सिव्हील लाइन्स पाेलिस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चाेरणाऱ्या दाेन अट्टल चाेरटयांना अटक करण्यात सिव्हील लाइन्स पाेलिसांना यश आले आहे. मोहम्मद उमर मोहम्मद रियाज वय २१ वर्ष व त्याचा साथीदार शेख रिजवान उर्फ गाझी शेख इरफान ऊर्फ शेख कालू वय २० वर्षं राहणार जुने शहर या दाेघांनी शहराच्या विविध भागातून दुचाकी चाेरल्याची माहीती सिव्हील लाइन्सचे ठाणेदार प्रदीप शिरस्कार यांना मीळाली. 

यावरुन त्यांनी दाेन्ही चाेरटयांना ताब्यात घेउन त्यांच्याकडून दाेन दुचाकी व मुद्देमाल जप्त केला. दाेन्ही आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल पल्सर १२५ रजिस्टर क्रमांक एम एच ३० बीएस ६१०६ किंमत एक लाख १० हजार रुपये, मोबाईल असा एकूण एक लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाइ पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कार यांचे मार्गदर्शनामध्ये गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार सुरेश लांडे नाईक पोलीस हवालदार किशोर सोनोने, संजय अकोटकार, पोलीस अमलदार गणेश निलखन, भूषण मोरे यांनी केली.

Web Title: Two-wheeled four-wheeler right-hand side in akola