राष्ट्रीय महार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीस धडक; एक ठार, एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 17:03 IST2018-04-24T17:00:44+5:302018-04-24T17:03:13+5:30

राष्ट्रीय महार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीस धडक; एक ठार, एक गंभीर
अकोला : अकोल्यातील शिवणी येथे मंगळवारी दुपारी माल वाहून नेणारा ट्रक व मोटरसायकलचा अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला.
अमरावती जिल्ह्यातील धानोरा वैद्य येथील सतीश जगदेवराव वानखडे हे त्यांच्या मित्रांसोबत सोबत मोटारसायकलवर अकोला शहराकडे येत होते. त्यावेळी अमरावती कडून येणाऱ्या माल वाहू ट्रकचा व वानखडे यांच्या मोटर सायकल मध्ये भीषण अपघात झाला. हि घटना आज मंगळवारी दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास शिवणी येथील टी पाईंट जवळ घडली. यामध्ये मोटरसायकल चालक सतीश जगदेवराव वानखडे यांचा जागीच मृत्यू झाला.तर त्याचा मित्र किरकोळ जखमी झाला आहे. यावेळी राष्ट्रीय महार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प पडली होती. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार किशोर शेळके व वाहतूक पोलिसांनी घटनास्थळ गाठले. यावेळी मार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक पोलिसांनी सुळरीत केली आहे. मृतक सतीश वानखडे हे अमरावती जिल्ह्यातील धानोरा वैद्य येथील रहीवासी असून अकोला शहराकडे येत असताना त्याचा दुर्देवी अपघात झाला. याप्रकरणी एमएडीसी पोलिसांनी ट्रक व वाहन चालकास ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरु केला आहे.