अकोला शहरात एकाच रात्री दोन घरफोड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 13:33 IST2019-04-30T13:32:53+5:302019-04-30T13:33:00+5:30
अकोला: जुने शहरातील डाबकी रोड परिसरात एकाच रात्री दोन घरफोड्या झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी डाबकी रोड पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अकोला शहरात एकाच रात्री दोन घरफोड्या
अकोला: जुने शहरातील डाबकी रोड परिसरात एकाच रात्री दोन घरफोड्या झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी डाबकी रोड पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, डाबकी रोड स्थित रेणुकानगर परिसरातील रहिवासी जामकर कुटुंबीय लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. सोमवारी सकाळी ते घरी परतले असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त दिसून आले. घरात चोरी झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी घटनेची माहिती डाबकी रोड पोलिसांना दिली. तपासणीदरम्यान घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याचे निदर्शनास आले. दुसरी घटना अंबिकानगर येथील रहिवासी अविनाश शेलार यांच्याकडे घडली. शेलार कुटुंबीयदेखील लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. घरी परत आल्यावर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घराची पाहणी केली असता, चोरट्यांनी रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण १८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे समोर आले. या प्रकरणी अविनाश शेलार यांनी डाबकी रोड पोलिसात तक्रार दिली. दोन्ही तक्रारीवरून पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.