दोन वृद्ध शेतकऱ्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 11:32 IST2020-09-04T11:31:11+5:302020-09-04T11:32:08+5:30

पांडुरंग अमृता पाथ्रीकर (७०) व रामकृष्ण संपत शिखरे (७४) अशी मृतकांची नावे आहेत.

Two elderly farmers die of electric shock | दोन वृद्ध शेतकऱ्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

दोन वृद्ध शेतकऱ्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

ठळक मुद्देदोघेही शेतात अंबाडीची भाजी आणण्यासाठी गेले होते. विद्युत खांबाला स्पर्श झाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

तेल्हारा : तालुक्यातील मनब्दा येथील शेतात विजेच्या खांबाला स्पर्श झाल्याने दोन वृद्ध शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार, ४ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजताचे सुमारास घडली. पांडुरंग अमृता पाथ्रीकर (७०) व रामकृष्ण संपत शिखरे (७४) अशी मृतकांची नावे आहेत.
मनब्दा येथील पांडुरंग पाथ्रीकर व रामकृष्ण शिखरे हे दोघे मित्र असून, ते नेहमी सोबतच राहायचे. शुक्रवारी हे दोघेही गावातील सहदेव खराबे यांच्या शेतात अंबाडीची भाजी आणण्यासाठी गेले होते. तेथे विहिरीजवळच्या विद्युत खांबाला स्पर्श झाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावकºयांनी शेतात धाव घेतली. दोघांचेही मृतदेह विहिरीजवळ पडलेले आढळून आले. तेल्हारा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तेल्हारा येथे पाठविले. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Two elderly farmers die of electric shock