पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा मन नदीत बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 15:24 IST2019-05-25T15:22:17+5:302019-05-25T15:24:06+5:30

बाळापूर (अकोला): वीट भट्टीवर काम करणाऱ्या मजुरांच्या दोन मुलांचा बाळापूर शहराजवळून वाहणाºया मन नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैैवी घटना शनिवारी सकाळी घडली.

Two boys drowned in the Man river in Balapur | पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा मन नदीत बुडून मृत्यू

पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा मन नदीत बुडून मृत्यू

ठळक मुद्देकुणाल कैलास काळे (१०) ऋत्विक प्रमोद मोरे (९) अशी मृतक बालकांची नावे आहेत. ते दोघेही बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील धाडी या गावचे आहेत. पाण्याचा अंदाज न आल्याने कुणाल काळे व ऋत्विक मोरे ही दोन मुले गंटागळ्या खात पाण्यात बुडाली.

बाळापूर (अकोला): वीट भट्टीवर काम करणाऱ्या मजुरांच्या दोन मुलांचा बाळापूर शहराजवळून वाहणाºया मन नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैैवी घटना शनिवारी सकाळी घडली. कुणाल कैलास काळे (१०) ऋत्विक प्रमोद मोरे (९) अशी मृतक बालकांची नावे असून, ते दोघेही बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील धाडी या गावचे आहेत.
बाळापूर शहराजवळच्या मन नदीपात्रात भरपूर पाणी आहे. परिसरातील विट भट्ट्यांवर काम करणाºया मजुरांची मुले सकाळी अकरा वाजताचे दरम्यान नदीपात्रात आंघोळीसाठी उतरली. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने कुणाल काळे व ऋत्विक मोरे ही दोन मुले गंटागळ्या खात पाण्यात बुडाली. नदीपात्रातील गाळात फसल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच पोलिस व नागरिकांनी शोध मोहिम राबवून नदीपात्रातून बुडालेल्या मुलांचे मृतदेह बाहेर काढले. दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

Web Title: Two boys drowned in the Man river in Balapur