दोन दुचाकींची समोरासमोर धडक : तीन गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 17:45 IST2019-05-17T17:40:43+5:302019-05-17T17:45:21+5:30
बाळापूर : दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने तीन जण गंभीर जखमी झाले.

दोन दुचाकींची समोरासमोर धडक : तीन गंभीर
बाळापूर : दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना १७ मे रोजी सकाळी ९ वाजता राष्टीय महामार्गावरील पारस फाट्यावर घडली. अपघातानंतर महामार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली होती.
वाडेगाव येथील संतोष साहेबराव सुरवाडे (३५)हा दुचाकी क्र.एमएच ३७ पी ५२६१ ने बाळापूरकडून जात होता. दरम्यान, पारस फाट्यावर समोरुन येत असलेली दुचाकी क्र.एम. एच.३० एसी ३७४५ ला सुरवाडे याच्या दुचाकीची अमोरासमोर धडक झाली. या अपघातात संतोष सुरवाडेसह दुसऱ्या दुचाकीवरील विशाल देवीदास निंबोकार (२२) व श्रीकृष्ण दामोदर निबोंकार रा. बेलुरा ता. पातुर हे तिघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच बाळापूर पोलीस स्टेशनचे सहा.पोलिस उपनिरीक्षक जयवंता शिंदे व पोलिस कर्मचारी गिरीष वीर यांनी तातडीने घटनास्थळावर धाव घेतली. तसेच जखमींना बाळापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ग्रामीण रुग्णालयात जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात येउन त्यांना सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे पाठवण्यात आले. या अपघातामुळे राष्टीय महामार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजुला करून वाहतुक सुरळीत केली. या प्रकरणी वृत्त लिहीस्तोवर बाळापूर पोलिसात कुठलीही नोंद नव्हती. (शहर प्रतिनिधी)