शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
2
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
3
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
4
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
5
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
8
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
9
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
10
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
11
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
12
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
13
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
14
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
15
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
16
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
17
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
18
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
19
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला

बळकावलेल्या संस्थेच्या आधारे दोन आश्रमशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 1:55 AM

अकोल्यातील सहायक धर्मादाय आयुक्तांकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नावाने १९९0 मध्ये नोंदणीकृत असलेल्या आणि सोलापूर, सांगली व मुंबई येथील १५ लोकांनी बळकावलेल्या या संस्थेवर सोलापूर जिल्हय़ात प्राथमिक निवासी आश्रमशाळा व माध्यमिक आश्रमशाळा घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या शाळांवर अनुदानही मिळविण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

ठळक मुद्देकोट्यवधींचा निधी मिळविलासोलापूर जिल्हय़ात आश्रमशाळा

सचिन राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोल्यातील सहायक धर्मादाय आयुक्तांकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नावाने १९९0 मध्ये नोंदणीकृत असलेल्या आणि सोलापूर, सांगली व मुंबई येथील १५ लोकांनी बळकावलेल्या या संस्थेवर सोलापूर जिल्हय़ात प्राथमिक निवासी आश्रमशाळा व माध्यमिक आश्रमशाळा घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या शाळांवर अनुदानही मिळविण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव आहे.आदर्श कॉलनीतील रहिवासी दामोदर कोंडाजी इंगळे यांनी त्यांच्या १५ सहकार्‍यांसह १९९0 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान रजिस्टर्ड क्रमांक २२५६/एकेएल ही संस्था अकोल्यात सहायक धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत केली होती; मात्र त्यानंतर ही संस्था सोलापूर, सांगली व मुंबई येथील रहिवासी असलेल्या १५ जणांनी अकोल्यातील सभासदांच्या बनावट स्वाक्षरी करून परस्पर ‘चेंज रिपोर्ट’ अकोला धर्मादाय आयुक्तांकडे सादर करून बळकावली. सदर संस्थेचे सोलापूर येथे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच सहायक धर्मादाय आयुक्तांनी या संस्थेच्या गांधी नगर व्हीएचबी कॉलनी येथील कार्यालयात नोटीस पाठविल्यानंतर हा प्रकार उघड झाला. संस्था बळकावल्याचे निदर्शनास येताच संस्थापक सभासदांना धक्का बसल्यानंतर त्यांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या किचकट प्रकरणी चौकशीस प्रारंभ केला असून, संस्थापक संचालकांचे बयान नोंदविले आहेत. सहायक धर्मादाय आयुक्तांकडूनही या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, सदर संस्थेवर सोलापूर जिल्हय़ात २0१0 मध्ये दोन आश्रमशाळा अनुदानावर घेण्यात आलेल्या असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एक माध्यमिक आश्रमशाळा असून, दुसरी प्राथमिक निवासी आश्रमशाळाही कार्यरत असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

दोन आश्रमशाळांना लाखोंचे अनुदानया दोन आश्रमशाळांवर २९ लाख रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांचे अनुदान घेण्यात आले आहे. दरवर्षी किती अनुदान घेण्यात आले, याचा सविस्तर तपशील.

विधिज्ञाच्या सहायकाकडून सेटिंगचे प्रयत्नडॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या संस्थापक सचिवासह संचालकांनी या प्रकरणाची तक्रार केल्यानंतर एका विधीज्ञाच्या साहायकाकडून संस्थापक संचालकांना पैशाचे आमीष देउन प्रकरण सेटींग करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा