जैन मुनि यांना अपशब्द वापरून शिवीगाळ करणारे दोघे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 17:35 IST2017-10-27T17:34:52+5:302017-10-27T17:35:59+5:30
अकोला: जैन धर्मीय एक मुनी आपल्या अनुयायांसोबत जात असताना न्यू तापडिया नगरातील दोघांनी त्यांना अडवून अपशब्द वापरून आणि अश्लील शिवीगाळ केल्याची घटना शुक्रवारी सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास दुबेवाडी लोकोशेड येथे घडली.

जैन मुनि यांना अपशब्द वापरून शिवीगाळ करणारे दोघे गजाआड
अकोला: जैन धर्मीय एक मुनी आपल्या अनुयायांसोबत जात असताना न्यू तापडिया नगरातील दोघांनी त्यांना अडवून अपशब्द वापरून आणि अश्लील शिवीगाळ केल्याची घटना शुक्रवारी सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास दुबेवाडी लोकोशेड येथे घडली. या प्रकरणात सिव्हिल लाईन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
बाबा रायटर चाळीत राहणारे राकेश सोहनलाल जैन यांच्या तक्रारीनूसार सकाळी ते जैन मुनि यांच्या सोबत जात असताना त्यांच्या अनुयायांना आणि जैन मुनि यांना दुबेवाडी रेल्वे लोकोशेड येथे दारूच्या नशेत असलेल्या विकास गायकवाड आणि राहूल गणपत सरकटे यांनी
अपशब्द वापरून आणि अश्लील शिवीगाळ करून राकेश जैन यांना मारहाण केली. राकेश जैन यांच्या तक्रारीनूसार सिव्हिल लाईन पोलिसांनी विकास गायकवाड आणि राहुल सरकटे याच्याविरुध्द भादंवि कलम 341, 295, 323, 504 नूसार गुन्हा दाखल केला आणि दोघांना अटक केली. शनिवारी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येईल.