वीज पडल्याने टीव्ही, पंखे निकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2016 02:40 IST2016-09-19T02:40:35+5:302016-09-19T02:40:35+5:30
कौलखेड जहागीर येथील घटनेत गावक-यांचे हजारोंचे नुकसान झाले.

वीज पडल्याने टीव्ही, पंखे निकामी
अकोला, दि. १८ : गत दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली असतानाच शनिवारी तालुक्यातील कौलखेड जहागीर येथे वीज पडल्याने अनेकांच्या घरातील टीव्ही, पंखे व कूलर यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू निकामी झाल्या. यामुळे गावकर्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. येथून जवळच असलेल्या कौलखेड जहागीर येथे शनिवारी एका झाडावर वीज पडली. यामुळे विजेचा दाब वाढून अनेकांच्या घरातील विजेचे साहित्य नादुरुस्त झाले. यामध्ये प्रकाश वाघमारे, गौतम शिरसाट, सदाशिव सरदार, अहमदशहा सिकंदरशहा, नाना वाघमारे, देवलाल गवई, मोतीराम वाघमारे, उमेश तायडे, नीलेश तायडे, गणेश तायडे, गणेश जानोरकर, विनोद तायडे, गजानन इंगळे व कैलास तायडे यांच्या घरातील हजारो रुपयांचे साहित्य निकामी झाले. नुकसानीचा सर्व्हे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.