शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

प्रहारचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांचा मृत्यू; अज्ञात हल्लेखोरांनी रात्री केला होता गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 7:55 AM

प्रहार जनशक्ती पक्षाचे अकोला जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

ठळक मुद्देप्रहार जनशक्ती पक्षाचे अकोला जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.त्यांच्यावर अकोट शहरातील पोलीस वसाहतींमध्ये शुक्रवारी रात्री गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. घटनेनंतर त्यांना तत्काळ अकोला येथे हलविण्यात आले होते. परंतु रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. 

अकोला - प्रहार जनशक्ती पक्षाचे अकोला जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांच्यावर अकोट शहरातील पोलीस वसाहतींमध्ये शुक्रवारी रात्री गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. घटनेनंतर त्यांना तत्काळ अकोला येथे हलविण्यात आले होते. परंतु रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर हे त्यांच्या खुमकर दूधडेअरीच्या बाहेर शुक्रवारी रात्री दहा ते साडे दहाच्या सुमारास मोबाइलवर बोलत आले. या ठिकाणी दोन दुचाकीस्वार त्यांच्याकडे येत असल्याचे त्यांना दिसले. त्यांना हल्ल्याची कुणकुण लागताच ते पोलीस वसहतीकडे पळाले. मात्र, हल्लेखोरांनी त्यांच्यावर पाठीमागून गोळीबार केला. त्यामुळे जमिनीवर कोसळले. त्यांना तातडीने पोलीस कर्मचाऱ्यांनी समोर असलेल्या डॉ. सुरेश व्यवहार यांच्या रुग्णालयात भरती केली.मात्र डॉक्टरांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. या ठिकाणी त्यांची प्रकृती बिघडल्याने आणि रक्तस्त्राव झाल्याने त्यांना अकोला येथील खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, काल रात्रीपासून आकोट येथे मोठा बंदोबस्त लावण्यात आला. पालकमंत्री बच्चू कडू हे रात्रीपासूनच जिल्ह्यात दाखल झाले असून, ते आकोट येथे आहेत.