शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
2
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
4
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
5
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
6
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
7
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
8
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
9
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
10
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
11
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
12
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
13
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
14
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
15
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
16
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
17
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
18
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
19
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
20
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा

तूर, हरभऱ्याच्या दरात घसरणच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2020 4:05 PM

शेतकऱ्यांना १ हजार २७५ रुपये या कमी दराने व्यापाºयांना हरभरा विकावा लागत आहे.

- राजरत्न सिरसाट

अकोला : शासनाने पीक कर्जमुक्तीचा धडाका लावला असताना दुसरीकडे अधारभूत किमतीपेक्षा तूर, हरभºयाचे दर कमी झाले असून, कापूस खरेदी केंद्रावरही मोजणी होत नसल्याने ट्रॅक्टरच्या रांगा लागल्या आहेत. या अनिश्चिततेमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.यावर्षी केंद्र शासनाने हरभºयाला (चणा) प्रतिक्विंटल ४ हजार ८७५ रुपये हमीदर जाहीर केले;परंतु बाजारात दर कोसळले असून, शासकीय खरेदी केंद्र अद्याप सुरू झाले नसल्याने शेतकऱ्यांना १ हजार २७५ रुपये या कमी दराने व्यापाºयांना हरभरा विकावा लागत आहे. यात उत्पादन खर्च निघत नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. हरभरा काढणी हंगामाच्या दोन आठवडे अगोदर तूर काढणीचा हंगाम संपला आहे. शेतकºयांनी तूर विक्रीस काढली आहे. तुरीची आधारभूत किंमत प्रति क्ंिवटल ५,८०० रुपये आहे. तथापि, आजमितीस बाजारात यापेक्षा ९०० रुपये कमी किमतीने तूर विकावी लागत आहे. तूर खरेदीसाठी आॅनलाइन नोंदणी करणे हे तर आहेच, याशिवाय सर्व कागदपत्रे आणणे त्यातही १२ टक्केपेक्षा अधिक आर्द्रता नको, अशा सर्व समस्या असल्याने राज्यातील तूर उत्पादक शेतकरी खासगी बाजाराला पसंती देत आहेत. एकट्या अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज सरासरी २,५०० क्ंिवटलवर तूर आणि सरासरी ५,५०० क्ंिवटल हरभरा आवक सुरू आहे. उडिदाची आधारभूत किंमत प्रति क्ंिवटल ५,७०० रुपये आहे. बाजारात किंमत सरासरी केवळ २,६०० रुपये आहे. म्हणजेच ३,१०० रुपये कमी किमतीत शेतकºयांना उडीद विकावा लागत आहे. मुगाचा एमएसपी ७ हजार ५० रुपये आहे. तथापि, बाजारात सरासरी ६ हजार रुपये दर असल्याने १ हजार रुपये कमी दराने शेतकºयांना विक्री करावी लागत आहे. कापूस नगदी पीक आहे; परंतु कापसाची आवक वाढल्याची सबब पुढे करीत शासकीय कापूस खरेंद्र केंद्रही आठ ते दहा दिवस बंद राहणार आहेत. परिणामी, सर्व शासकीय कापूस खरेदी केंद्रांवर कापसाचे ट्रक, ट्रॅक्टर रांगेत आहेत. सद्यस्थितीत मुला-मुलींचे लग्न, वर्षभर केलेली उसनवारी, शेतकरी परत करीत असतात; परंतु हाती पूरक पैसाच पडत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. 

 

टॅग्स :Akola APMCअकोला कृषी उत्पन्न बाजार समितीAkolaअकोलाagricultureशेती