मंगरूळपीर येथे बार मालकास जीवे मारण्याचा प्रयत्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 18:36 IST2019-01-28T18:35:34+5:302019-01-28T18:36:11+5:30
मंगरूळपीर : शहरातील राजेश वाईनबार येथे २७ जानेवारीच्या रात्री १०.३० वाजताच्या सुमारास तिघांनी दारु न मिळाल्याच्या कारणावरून बार मालकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

मंगरूळपीर येथे बार मालकास जीवे मारण्याचा प्रयत्न!
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर : शहरातील राजेश वाईनबार येथे २७ जानेवारीच्या रात्री १०.३० वाजताच्या सुमारास तिघांनी दारु न मिळाल्याच्या कारणावरून बार मालकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत दाखल फिर्यादीवरून रात्री उशीरा आरोपींविरूद्ध गुन्हे नोंदविण्यात आले. तसेच दोघांना अटक करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन प्रकाश परळीकर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की पंकज मुकूंद रघुवंशी, योगेश एकनाथ गादेकर व गोट्या किशोर रघुवंशी (सर्व रा. मंगरुळपीर) यांनी २७ जानेवारीच्या रात्री १०.३० वाजताच्या सुमारास आपणाकडे दारूची मागणी केली; परंतु बार बंद झाल्याने ती देता येणार नसल्याचे सांगितले असता, आरोपींनी दोन्ही हात पकडून तथा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला व दगड फेकही केली. अशा आशयाच्या फिर्यादीवरुन मंगरुळपीर पोलिसांनी आरोपींविरूद्ध कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६, ४२७ भादंविनुसार गुन्हे दाखल केले. यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.