शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा
3
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
4
इंधन-गॅसचा पुरवठा लवकरच सुरळीत होणार? शनिवारी २० जहाजांनी पार केले होर्मुझ...
5
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
6
सूट-बूट घालून आला, पाहुण्यांमध्ये मिसळला अन् ५ लाख घेऊन पळाला; Video पाहून बसेल धक्का
7
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
8
Latest Marathi News LIVE Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागण्या काय?
9
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
10
‘विकसित भारत संकल्पात पालघरचा सहभाग हवाच’ राज्यपालांच्या हस्ते डहाणूत आरोग्यसेवांचे लोकार्पण
11
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
12
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
13
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
14
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
15
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
16
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
18
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
19
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
20
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकचालकाच्या खून प्रकरणात क्लीनरला जन्मठेप

By admin | Updated: June 14, 2017 00:26 IST

एमआयडीसीत घडले होते हत्याकांड

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महाराष्ट्र औद्योगिक वसाहतमधील फेज-२ मध्ये २०१५ मध्ये घडलेल्या ट्रकचालकाच्या खून प्रकरणातील आरोपी क्लीनरला जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासोबतच आरोपीस पाच हजार रुपये दंड ठोठावला असून, दंड न भरल्यास आणखी तीन महिन्यांच्या शिक्षेची तरतूद न्यायालयाने केली आहे.उत्तर प्रदेशातील अलाहाबाद जिल्ह्यातील राजरुपूर येथील रहिवासी तथा ट्रकचालक विनोदकुमार त्रिभुवनसिंह (५०) यांची २१ नोव्हेंबर २०१५ रोजी त्यांच्याच ट्रकवर क्लीनर म्हणून असलेला उत्तर प्रदेशातील कोसंबी जिल्ह्यातील वनी येथील रहिवासी पवनकुमार कृपाशंकर तिवारी याने लोखंडी टॉमी डोक्यावर मारून हत्या केली होती. टॉमी मारल्यानंतर विनोदकुमार पहाटेपासूनच रक्तबंबाळ अवस्थेत फिरत होता. त्याला मनोरुग्ण समजल्याने मदत मिळाली नाही. अशातच त्याच्या मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती सिव्हिल लाइन पोलिसांना देण्यात आल्यानंतर २६ नोव्हेंबरच्या पहाटे त्यांनी घटनास्थळ गाठले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला; मात्र क्लीनर तिवारी गायब असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी तिवारी याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यानंतर त्याने विनोदकुमारचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर सिव्हिल लाइनचे पीएसआय हर्षल चापले यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पवनकुमार कृपाशंकर तिवारी याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या प्रकरणाचा तपास चापले यांनी केल्यानंतर दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांच्या न्यायालयात सादर केले. न्यायालयाने या खून प्रकरणात १३ साक्षीदार तपासल्यानंतर तसेच समोर आलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे आरोपी पवनकुमार तिवारी याला विनोदकुमार यांच्या खूनप्रकरणी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे जिल्हा सहायक सरकारी वकील अ‍ॅड. विनोद फाटे यांनी काम पाहिले.