राष्ट्रीय महामार्गवर ट्रकची दुचाकीस धडक; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 19:26 IST2021-09-11T19:25:55+5:302021-09-11T19:26:11+5:30

Accident Near Murtijapur : सतिश रघुनाथ सुलताने (३८) असे मृतकाचे नाव आहे. 

Truck hit two-wheeler on national highway; One killed | राष्ट्रीय महामार्गवर ट्रकची दुचाकीस धडक; एक ठार

राष्ट्रीय महामार्गवर ट्रकची दुचाकीस धडक; एक ठार

मूर्तिजापूर : माना पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या जामठी फाट्या जवळ राष्ट्रीय महामार्गवर  उमा नदीच्या पुला नजीक भरधावा ट्रक ने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवर जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास घडली. सतिश रघुनाथ सुलताने (३८) असे मृतकाचे नाव आहे. 
       अमरावती येथील रहिवासी असलेले सतिश रघुनाथ सुलाताने  ३८ हे दुचाकी क्रमांक एमएच२७ केएल ८२२७ ने अमरावतीहून मूर्तिजापूरकडे येत असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रक क्रमांक एमएच४८सी८६४९ ने  जबर धडक दिली त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती  मिळताच  माना पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक घनश्याम पाटील व त्यांचे सहकारी तसेच वंदेमातरम आपत्कालीन पथक घटनास्थळी तत्काळ दाखल झाले व आपत्कालीन पथकाच्या मदतीने मृतदेह लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पोचवला. अधिक तपास ठाणेदार कैलास भगत यांच्या मार्गदर्शनाखाली माना पोलीस करीत आहेत.

Web Title: Truck hit two-wheeler on national highway; One killed