ट्रकची समोरासमोर धडक; एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:56 IST2021-01-08T04:56:48+5:302021-01-08T04:56:48+5:30
मूर्तिजापूर : ग्रामीण पोलीस ठाणेअंतर्गत येत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर अनभोरा बसथांब्यानजीक दोन ट्रकचा समोरासमोर अपघात होऊन एक जण ठार ...

ट्रकची समोरासमोर धडक; एक ठार
मूर्तिजापूर : ग्रामीण पोलीस ठाणेअंतर्गत येत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर अनभोरा बसथांब्यानजीक दोन ट्रकचा समोरासमोर अपघात होऊन एक जण ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान घडली.
अमरावतीकडून अकोलाकडे आयशर ट्रक(एम.एच.१२ एल.टी.७७३६) हा जात असताना विरुद्ध दिशेने येत असलेल्या ट्रक (एम.एच.३२ एजे ३३५५) याने आयशर ट्रकला समोरून जोरदार धडक दिली. आयशरचालक केबिनमध्ये फसल्याने चालक गोविंद विश्राम पाल (४३, रा. नागपूर) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की, अपघातानंतर आयशर ट्रकने पेट घेतला होता, ग्रामस्थांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. येथील वंदेमातरम आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेऊन दोन तासांच्या परिश्रमानंतर केबिन तोडून मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळविले. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरील काही तासांसाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणात (एमएच ३२ एजे ३३५५) ट्रकचालकाविरुद्ध भरधाव व निष्काळजी वाहन चालवल्याने कलम २७९, ३०४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सुभाष उघडे पोलीस शिपाई अनिल अहेरवाल करीत आहे. (फोटो)